तानाजी सावंतांच्या घरात राष्ट्रवादीने सोडले‌ खेकडे (व्हिडिओ)

crab
crab

पुणे : जलसंधारणमंत्री तानाजी सावंत यांच्या कात्रज येथील घरात महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी खेकडे सोडले. सावंत यांचे घर पोखरणारे खेकडे पकडून राष्ट्रवादी काँग्रेसने आज (ता.9) आंदोलन केले. तिवरे धरण फोडणारे हेच खेकडे असल्याचा दावा करत त्यांनी सावंत यांच्या विधानाचा निषेध केला आहे.

तानाजी सावंत यांनी खेकड्यांमुळे कोकणातील तिवरे धरण फुटल्याचा दावा केला होता. त्याचा विविध स्तरांतून निषेध होत आहे. महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुणे शहराध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या नेतृत्त्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. या खेकड्यांना पकडून भारती विद्यापीठ पोलिसांच्या स्वाधीन करून ३०२ चा गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com