हेल्मेट वापरण्यात कमीपणा कसला: अजित पवार

बारामती- येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने आयोजित रस्ता सुरक्षा सप्ताहानिमित्त आयोजित कार्यक्रमात विद्यार्थ्यांसमवेत अजित पवार यांनी छायाचित्र काढून घेतले.
बारामती- येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने आयोजित रस्ता सुरक्षा सप्ताहानिमित्त आयोजित कार्यक्रमात विद्यार्थ्यांसमवेत अजित पवार यांनी छायाचित्र काढून घेतले.

बारामती: हेल्मेटचा वापर आपल्या सुरक्षिततेसाठी असतो, तो वापरण्यात कमीपणा कसला वाटतो, असा सवाल करत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज हेल्मेटचा वापर गरजेचाच असल्याचे प्रतिपादन केले.

तिसाव्या रस्ता सुरक्षा सप्ताहाचे औचित्य साधून येथील उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात अजित पवार बोलत होते. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्वास देवकाते, नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, सभापती संजय भोसले, उपनगराध्यक्ष बिरजू मांढरे, उपसभापती शारदा खराडे, गटनेते सचिन सातव, संभाजी होळकर, इम्तियाज शिकीलकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

पवार म्हणाले, रस्त्यावर चालताना शॉर्टकट वापरण्याचा प्रयत्न केला तर आयुष्य एका क्षणात संपू शकते, त्या मुळे अतिघाई व नियमांचे उल्लंघन होणार नाही याची काळजी प्रत्येकाने घ्यायला हवी. नियम पाळण्याची सुरवात प्रत्येकाने स्वताःपासून केली तर अपघात होण्याची शक्यता मावळते. अपघातातील जखमींना मदत करुन त्यांचा जीव वाचविणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे, त्या मुळे कसलीही भीती न बाळगता अपघातग्रस्ताचा जीव वाचविण्यास प्रत्येकाने प्राधान्य द्यावे.

हेल्मेटचा वापर करताना कमी पणा कसला वाटतो, असा प्रश्न विचारत दुचाकीस्वारांनी हेल्मेटचा वापर करावा असा सल्लाही पवार यांनी दिला. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी दत्तात्रय सांगोलकर यांनी प्रास्ताविकात रस्ता सुरक्षा सप्ताहाचा आढावा घेतला. या प्रसंगी रस्ता सुरक्षा सप्ताहानिमित्त नियमांची माहिती देणा-या पत्रकाचे प्रकाशन पवार यांनी केले.

...तर कायदा बदलू: अजित पवार
भविष्यात आमचे सरकार आले तर दारु पिऊन गाडी चालविताना जो वाहनचालक सापडेल त्याचा वाहन चालविण्याचा परवाना कायमस्वरुपी रद्द करण्याबाबत कायदाच करु. नियमांचे उल्लंघन करणा-यांवर कडक कारवाईची तरतूद हवी, त्या शिवाय वाहतूकीला शिस्त लागणार नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com