राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेलेल्या नेत्याला लागली लॉटरी

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 23 January 2021

राष्ट्रवादी कॉंग्रेसमधून भाजपवासी झालेले जालिंदर कामठे यांच्या घरवापसीची चर्चा सुरू असतानाच भाजपने त्यांची पक्षाच्या पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षपदी निवड केली. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी त्यांना शुक्रवारी (ता. २२) पुणे येथे नियुक्तीपत्र दिले.

पुणे - राष्ट्रवादी कॉंग्रेसमधून भाजपवासी झालेले जालिंदर कामठे यांच्या घरवापसीची चर्चा सुरू असतानाच भाजपने त्यांची पक्षाच्या पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षपदी निवड केली. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी त्यांना शुक्रवारी (ता. २२) पुणे येथे नियुक्तीपत्र दिले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कामठे हे काँग्रेसच्या विद्यार्थी संघटनेचे व पुणे जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष होते. त्यावेळी त्यांच्या बंगल्यावरच सन १९९९ मध्ये राष्ट्रवादीची स्थापना झाली. राष्ट्रवादीकडून तेच जिल्हा परिषदेचे पहिले अध्यक्ष झाले. ते सन २०१४ ते २०१८ या कालावधीत पुणे जिल्हा राष्ट्रवादीचे अध्यक्ष; तर सन २०१८ पासून राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस झाले. मात्र, पुरंदर विधानसभा मतदारसंघ जागावाटपात राष्ट्रवादीकडून काँग्रेसकडे गेला. त्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. मात्र, ते पक्षात फारसे सक्रीय नव्हते. भाजपच्या जिल्ह्यातील कोअर कमिटीत मात्र होते.

सीरममधील आगीसंदर्भात आलं महत्त्वाचं अपडेट; तपास पथकानं दिली माहिती

दरम्यान, नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये पुरंदरमध्ये राष्ट्रवादीला अनेक ठिकाणी फटका बसला. त्यामुळे नव्या सत्तासमीकरणांमध्ये कामठे यांच्यासारखा नेता राष्ट्रवादीत हवा, अशी चर्चा झाली. याप्रसंगी माजी राज्यमंत्री बाळा भेगडे, जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, अतुल देशमुख, प्रवीण काळभोर आदी उपस्थित होते. 

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NCP BJP Leader Jalinder Kamathe President of Western Maharashtra Politics