Loksabha 2019 : आपल्याला आजोबांना पंतप्रधान बनवायचंय: पार्थ पवार

Parth pawar
Parth pawar

पिंपरी : आता आपल्याकडे फक्त ३५ दिवस राहिले आहेत. आता सर्वांना एकत्र मिळून काम करायचंय. आपल्याला आजोबांना पंतप्रधान बनवायचंय, हेच आपल्या सर्वांचे ध्येय आहे, असे बोलत मावळ मतदारसंघातील प्रचारावेळी दुसरे भाषण करताना पार्थ पवार यांच्यात आत्मविश्वास जाणवला. हातात कुठलीही चिठ्ठी न घेता त्यांनी ध्वनिक्षेपक घेतला आणि न अडखळता, प्रवाहीपणे छोटेखानी भाषण केले. श्रोत्यांनीदेखील त्यांना टाळ्यांच्या गजरात प्रोत्साहन दिले.

काही दिवसांपूर्वी त्यांनी केलेल्या भाषणाची खिल्ली समाज माध्यमातून उडवली गेली. त्या पार्श्‍वभूमीवर आज त्यांच्या भाषणाकडे लक्ष लागले होते. शहीद दिनानिमित्त त्यांनी आज चिंचवड येथील क्रांतिवीर चापेकर बंधू यांच्या स्मारकाला भेट दिली. त्या वेळी त्यांचे हे भाषण झाले.

ते म्हणाले, ‘‘पिंपरी-चिंचवडमध्ये आज ज्या पद्धतीनं आपल्या पक्षाने काम केलंय, ते लोकांपर्यंत पोचले पाहिजे. जर नरेंद्र मोदी गुजरातमधील विकासकामे भारतभर मांडू शकतात, तर आपण पिंपरी-चिंचवड महाराष्ट्रभर का मांडू शकत नाहीत? मी १८ वर्षांचा असताना इथं काम सुरू केलं असतं तर लग्नही झालं असतं माझं. उगाचच मी मुंबईत वेळ घालवला.’’ त्यानंतर राष्ट्रवादी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यातही त्यांनी भाषण केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com