Rahul Gandhi Pune : 'राष्ट्रवादी'च्या उमेदवारांची राहुल गांधींसह 20 मिनिटे चर्चा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 5 एप्रिल 2019

पुणे : काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्याबरोबर दुष्काळ, जाहिरनामा, प्रचारातील मुद्दे आदींबाबत सविस्तर चर्चा झाली, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली.

या वेळी मावळ मधील उमेदवार पार्थ पवार, शिरूर मधील उमेदवार डॉ. अमोल कोल्हे, शहराध्यक्ष चेतन तुपे, जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर आदी उपस्थित होते. सुमारे 20 मिनिटे चर्चा झाली. राहुल यांना उमेदवारांची ओळख करून दिल्याचे सुळे यांनी सकाळशी बोलताना सांगितले.

काँग्रेस अध्यक्ष सध्या महाराष्ट्रात दौऱ्यावर आहेत. कालच (ता. 4) त्यांची नागपूरमध्ये सभा झाली. आज ते पुण्यातील तीन ते चार हजार विद्यार्थ्यांशी संवाद साधतील. हा कार्यक्रम राजकीय नसून केवळ विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यासाठी आयोजित करण्यात आला आहे. 

Web Title: NCP candidates from Pune discussed with Rahul Gandhi for 20 mins