राष्ट्रवादीच्या कोअर कमिटीची पुण्यात बैठक; प्रफुल्ल पटेलांची दांडी

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 17 नोव्हेंबर 2019

राज्याच्या राजकारणातील नवी समीकरणं आणि उद्यापासून सुरू होणारे संसदीय अधिवेशन यावर बैठकीत चर्चा होत आहे.

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोअर कमिटी सदस्यांची पुण्यात मोदी बाग येथे बैठक होत आहे. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक होत आहे. राज्याच्या राजकारणातील नवी समीकरणं आणि उद्यापासून सुरू होणारे संसदीय अधिवेशन यावर बैठकीत चर्चा होत आहे.

बैठकीला शरद पवार यांच्यासह अजित पवार, सुप्रिया सुळे, दिलीप वळसे-पाटील, छगन भुजबळ, जयंत पाटील, सुनील तटकरे, हसन मुश्रीफ, अनिल देशमुख, धनंजय मुंडे, प्रवक्ते नवाब मलिक, जितेंद्र आव्हाड आदी प्रमुख नेते उपस्थित आहेत. या बैठकीला राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांची अनुपस्थिती खटकणारी आहे. गेल्या काही दिवसांत पक्षाच्या प्रमुख बैठकांमध्ये प्रफुल्ल पटेल यांची अनुपस्थिती चर्चेचा विषय ठरली आहे. आजही प्रफुल्ल पटेल यांनी दांडी मारल्याने राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवयां उंचावल्या आहेत.

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

नेहमीचीच बैठक
राष्ट्रवादीची ही बैठक कशासाठी आयोजित करण्यात आली आहे. यावर अजित पवार यांना आज, दुपारी विचारण्यात आलं. त्यावर अजित पवार यांनी ही बैठक नेहमीची आहे. शरद पवार सातत्याने पक्षाच्या नेत्यांची अशी बैठक घेऊन आढावा घेत असतात. तसेच सूचनाही देत असतात, असे अजित पवार यांनी मीडियाशी बोलताना स्पष्ट केले आहे.

आम्ही मेगाभरती नाहीतर मेरीट भरती करू : जयंत पाटील


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NCP core committee meeting praful patel is absent in pune