आम्ही मेगाभरती नाहीतर मेरीट भरती करू : जयंत पाटील

टीम ई-सकाळ
रविवार, 17 नोव्हेंबर 2019

राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक सुरु

मुंबई : राष्ट्रवादीच्या महत्त्वाच्या नेत्यांची बैठक होत आहे. भाजपमध्ये गेलेले आणि काही अपक्ष आमच्या संपर्कात आहेत. आम्ही मेगाभारती करणार नाही. तर मेरिट भरती करु, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितले. 

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

राज्यात सरकार स्थापनेवरून विविध पक्षातील नेतेमंडळींकडून वक्तव्य केली जात आहे. त्यातच आता जयंत पाटील यांनी याबाबत वक्तव्य केले. भाजपबरोबर जाणार का? असे त्यांना विचारण्यात आल्यावर त्यांनी आम्ही ज्यांच्याविरुद्ध लढलो. आमची आणि त्यांची विचारधारा वेगळी आहे. त्यामुळे त्यांच्याबरोबर जाणार नाही, असेही ते म्हणाले.

मराठी अस्मितेचा हुंकार म्हणजे बाळासाहेब ठाकरे : शरद पवार

शिवसेनेबरोबर कसे जाणार यावर बोलताना पाटील म्हणाले, दगडापेक्षा वीट कशी मऊ आहे. जनतेच्या मनातील सरकार आम्ही देणार पण ते स्थिर सरकार देण्याबाबत प्रयत्न सुरू आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक सुरु

दरम्यान, सरकार स्थापनेवरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची बैठक सुरु आहे. त्यासाठी सुनील तटकरे, धनंजय मुंडे, हसन मुश्रीफ, अनिल देशमुख, सुप्रिया सुळे, जितेंद्र आव्हाड, नवाब मलिक आदी नेतेमंडळी उपस्थित आहेत.

बाळासाहेबांना अभिवादन करताना, फडणवीस म्हणतात 'स्वाभिमान जपा'


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: We will do merit bharti says NCP Leader Jayant Patil