Vidhan Sabha 2019 : हडपसरमध्ये राष्ट्रवादीने सामान्यांना आपला वाटणारा उमेदवार दिला : अजित पवार

 amol-kolhe-.jpg
amol-kolhe-.jpg

हडपसर : ''हडपसर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सामान्यांना आपला वाटणारा, सुसंस्कृत उमेदवार दिला आहे. समाजातील सर्व घटकांना आपलेसे वाटणारे, समजून घेणारे हे व्यक्तिमत्त्व आहे. स्व. खासदार विठ्ठल तुपे यांच्या विकासाच्या राजकारणाचे संस्कार त्यांच्यावर झालेले आहेत. हीच ताकद त्यांना विधानसभेत काम करायला मिळाली तर निश्चितच हडपसर विधानसभा मतदार संघाला प्रगतीच्या वाटेवर घेऊन जातील यात मला शंका वाटत नाही,'' असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

हडपसर विधानसभा मतदारसंघाचे महाआघाडीचे उमेदवार चेतन विठ्ठल तुपे यांच्या प्रचारार्थ ते हडपसर येथे रॅलीत सहभागी झाले होते. त्यावेळी ते बोलत होते. ''गेल्या ५ वर्षांपासून आपण युती सरकार पाहत आहोत. ते मतं मिळवण्यासाठी सत्तेचा गैरवापर करतात. निवडून येतात. मी सुद्धा १५ वर्षांच्या सत्ताकाळात ३ वेळा सरकारमध्ये काम केलं. पण पैसे देऊन मंत्रिपद मिळवणारी माणसं मी पाहिली नव्हती, अशी माणसं जनेतची कामं काय मार्गी लावणार,'' अशा शब्दांत अजित पवार यांनी युती सरकारवर टीका केली. 

''गेल्या पाच वर्षांपासून हडपसर विधानसभा मतदार संघाचा विकास खुंटलेला आहे. इथल्या आमदारांनी काय केले हे संपूर्ण महाराष्ट्राने बघितले. वाहतूक कोंडी, कचरा, पाणी, रस्त्यांची दुर्दशा यावर हे बोलायला तयार नाही. न केलेल्या कामांचा डंका वाजवतात. त्यामुळे या निवडणूकीत नक्कीच मतदार परिवर्तन करतील याची मला खात्री असल्याचे पवार यांनी नमूद केले. 

दरम्यान खासदार डॉ अमोल कोल्हे यांनी मुंढवा व कात्रज परिसरात दोन सभा घेतल्या. सभेला मोठी गर्दी होती. सर्व मतदार संघ राष्ट्रवादीमय झाला होता. याप्रसंगी सुरेश घुले, राजलक्ष्मी भोसले, हेमलता मगर, वैशाली बनकर, प्रशांत जगताप, नंदा लोणकर, योगेश ससाणे, बंडूतात्य़ा गायकवाड, पूजा कोद्रे, अशोक कांबळे, संदीप कोद्रे, आनंद अलकुंटे, संदिप तुपे, प्रविण तुपे, शिवाजी पवार, फारूख इनामदार,  अजय गफूर पठाण, अनिस सुंडके हाजी फिरोज, रवी शेंडके उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com