

Rupali Thombre Faces Action After Criticizing Rupali Chakankar
Esakal
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या गटातील रुपाली ठोंबरे आणि रुपाली चाकणकर यांच्यात गेल्या काही दिवसांपासून संघर्ष सुरू आहे. एकाच पक्षात असून एकमेकींवर आरोप-प्रत्यारोपामुळे दोघींमध्ये वाद सुरू आहे. दरम्यान, रुपाली पाटील यांनी फलटणमधील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणावरून रूपाली चाकणकर यांच्यावर टीका केली होती. यावरून रूपाली ठोंबरे यांना पक्षाने शिस्तभंग कारवाईची नोटीस पाठवलीय. या नोटिसीला ७ दिवसांच्या आत उत्तर देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. रूपाली ठोंबरे यांनी ७ दिवस हा कालावधी खूपच कमी असल्याचं म्हणत यावर प्रतिक्रिया दिलीय.