Vidhan Sabha 2019 : पुण्यात अजित पवार, अमोल कोल्हे यांचा रोड शो 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 19 ऑक्टोबर 2019

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचा हडपसर मतदारसंघात मोठा रोड शो होणार होता. सकाळी पाऊस असल्याने रोड शो रद्द केल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधल्यानंतर त्यांनी रोड शो केला. खासदार कोल्हे यांना धनकवडी भागात काही काळ रोड शो केला.

पुणे : भर पावसात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सभा घेऊन मैदान गाजवलेले असताना, पुण्यात मात्र मुसळधार पावसाने राष्ट्रवादीसह सर्वच पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचार रॅली खोळंबल्या होत्या. सकाळी ९ वाजता सुरू होणाऱ्या रॅलीला उशीर झाला अन् हडपसर येथे अजित पवार, खासदार डाॅ. अमोल कोल्हे यांना त्यांच्या रोड शो उरकावा लागला. तर, अनेक ठिकाणी "थांब भाऊ जरा पाऊस कमी होऊ दे" असे म्हणत कार्यकर्ते घरातच आहेत. 

शनिवारी सायंकाळी विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची सांगता होत आहे, त्यामुळे आजच्या दिवसात शक्तीप्रदर्शन करत संपूर्ण दिवस पिंजून काढण्यासाठी महायुती, आघाडीच्या उमेदवारांनी दुचाकी रॅलीचे आयोजन केले होते. सकाळी ९-१० वाजता रॅली सुरू होणार होत्या. सकाळी मुसळधार पावसाला सुरूवात झाल्यानंतर तो काही वेळात थांबेल असा अंदाज होता, पण संततधार सुरूच आहे.सर्वांचे नियोजन बिघडून गेले आहे.  

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचा हडपसर मतदारसंघात मोठा रोड शो होणार होता. सकाळी पाऊस असल्याने रोड शो रद्द केल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधल्यानंतर त्यांनी रोड शो केला. खासदार कोल्हे यांना धनकवडी भागात काही काळ रोड शो केला. इतर मतदारसंघात हिच परस्थिती आहे. पाऊस कमी झाला की रॅली काढू असे म्हणत उमेदवार व कार्यकर्ते आडोशाला थांबून आहेत. अनेकांनी तर घर ही सोडलेले नव्हते. दुपारी १२ नंतर दुचाकी रॅलीसाठी लगबग सुरू झाली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NCP leader Ajit Pawar and Amol Kolhe hold road show in Pune