esakal | जेव्हा अजित पवार, बच्चेकंपनीला शाबासकी देतात!
sakal

बोलून बातमी शोधा

ncp leader ajit pawar appreciated kids who donated

रमजान ईदमध्ये मिळालेली ईदी जपून ठेवली आणि ही 15 हजारांची रक्कम नुकतीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सुपूर्द केली. 

जेव्हा अजित पवार, बच्चेकंपनीला शाबासकी देतात!

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

बारामती : समाजाच्या विविध स्तरातून तसेच घरातूनही कोरोनाशी दोन हात करताना जी सामाजिक बांधिलकी दाखवली जात होती, ती पाहून छोट्या बाळगोपाळांनीही उत्स्फूर्तपणे आपलीही मदत गोळा केली आणि ती थेट राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द केली. बारामतीतील अमजद बागवान व फिरोज बागवान यांच्या मुलांनी हा आदर्श घालून दिला. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

रमजान ईदमध्ये मिळालेली ईदी जपून ठेवली आणि ही 15 हजारांची रक्कम नुकतीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सुपूर्द केली. जिशान फिरोज बागवान, मलिका अमजद बागवान, फरहान फिरोज बागवान आणि अमन अमजद बागवान या बच्चेकंपनीकडे रमजान ईदनंतर 15 हजार रुपये ईदी जमा झाली. यातून मुलांसाठी काहीतरी खरेदी होईल असा पालकांचा अंदाज होता, मात्र या मुलांनी ही रक्कम कोरोनासाठी आपण देऊ व सामाजिक बांधिलकी जपू, असा विचार पालकांकडे बोलून दाखविला. स्थानिक पत्रकार नविद पठाण यांनी ही बाब उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कानावर घातली. त्यानंतर या मुलांसह फिरोज बागवान, बतुल शेख यांनी या रकमेचा धनादेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सुपूर्द केला.  

आणखी वाचा - पुण्याच्या महापौरांच्या कुटुंबातील 8 जण कोरोना पॉझिटिव्ह

अजित पवार यांना या मुलांच्या कृतीचे कौतुक वाटले. यांनी या मुलांची आस्थेवाईकपणे चौकशी करत गाडीतून एक खाऊचा पुडा त्यांना भेट दिला. इतकेच नाही तर आपल्या फेसबुक पेजवरही अजित पवार यांनी या छोट्याशा उपक्रमाची दखल घेत या चिमुकल्यांचे कौतुक केले आहे. लहान वयात समाजभान जपणाऱ्या अशा सर्वच छोट्या मित्र-मैत्रिणींचं करावं तेवढं कौतुक थोडं आहे, अशा शब्दात अजित पवार यांनी या बच्चेकंपनीला शाबासकीची थाप दिली.