एक फोन आला आणि अजित पवार बारामतीतून मुंबईच्या दिशेने निघाले

टीम ई-सकाळ
Friday, 6 December 2019

बारामती : सत्ता संघर्षाच्या घडामोडी झाल्यानंतर आता सर्व आमदार आपल्या आपल्या मतदारसंघांमध्ये बिझी आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस नेते अजित पवार देखील त्यांच्या बारामती विधानसभा मतदारसंघात कार्यरत आहेत आणि कामकाजाच्या बैठकाही सुरू आहेत. आज, सकाळी अजित पवार बारामतीत नियोजित बैठकांना उपस्थित राहण्याच्या तयारी असताना, ते मुंबईला निघून गेले आहेत. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे एप

काय घडलं?
माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आज आपला बारामती दौरा अर्धवट सोडून तातडीने मुंबईला निघून गेले. अजित पवार अचानकच मुंबईला निघून गेल्यामुळे मंत्रिमंडळ विस्ताराबाबत हालचालींना प्रारंभ झाला की काय? अशी शक्यता व्यक्त होत आहे. 
अजित पवार काल रात्री बारामतीत आले होते. आज सकाळी त्यांनी कार्यकर्त्यांच्या भेटी घेतल्या. त्या नंतर बारामती नगरपालिकेच्या नगरसेवकांसोबत त्यांची बैठक ठरली होती, त्या नंतर सोमेश्वर कारखान्याच्या पदाधिका-यांसोबत पवार चर्चा करणार होते. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्रामगृहावर ही बैठक होणार होती. मात्र, अचानकच एक फोन आल्यानंतर अजित पवार तातडीने मुंबईच्या दिशेने रवाना झाले. 

आणखी वाचा - बाबासाहेबांचा निवासस्थान राष्ट्रीय स्मारक व्हावे : मुख्यमंत्री ठाकरे

आणखी वाचा - सिंचन गैरव्यवहारातून अजित पवार सुटले

कोणाचा फोन आला?
अजित पवार यांना कोणाचा फोन आला?, यावरून चर्चा सुरू होती. पण. ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा फोन आल्यानंतर अजित पवार मुंबईला गेल्याची चर्चा आहे. दरम्यान, आज राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी अजित पवार यांच्याशी चर्चा केली. मतदारसंघातील विविध कामेही त्यांनी आज सकाळपासून मार्गी लावली.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ncp leader ajit pawar cancels all meetings in baramati heading towards mumbai