esakal | 'पक्ष सोडल्यानंतर काय होतं? साताऱ्यात बघितलंय सगळ्यांनी'
sakal

बोलून बातमी शोधा

ncp leader ajit pawar statement after party meeting satara udayanraje bhosale

राज्यात सरकार स्थापनेचा फॉर्म्युला ठरला या बातम्यांमध्ये काहीही तथ्य नाही, असं अजित पवार यांनी सांगितलं. 

'पक्ष सोडल्यानंतर काय होतं? साताऱ्यात बघितलंय सगळ्यांनी'

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

पुणे : पक्ष सोडल्यावर काय निकाल लागतो, हे साताऱ्यात सगळ्यांना दिसलंय, असं वक्तव्य करून, राष्ट्रवादी काँग्रेसचे गट नेते अजित पवार यांनी माजी खासदार उदयनराजे भोसले यांना टोला लगावलाय. त्याचवेळी राज्यात अनेक आमदार पहिल्यांदाच निवडून आले आहेत. त्यामुळं फाटाफूट होणार नाही, असा विश्वासही पवार यांनी व्यक्त केला. 

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा 

मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन:देवेंद्र फडणवीसांसमोर घोषणाबाजी 

पक्षाच्या बैठकीनंत अजित पवार यांनी पुण्यात मीडियाशी संवाद साधला. ते म्हणाले, 'शरद पवारसाहेब नेहमीच पक्षातील नेत्यांना घेऊन चर्चा करत असतात. कशासाठी त्याची प्रसिद्धी केली जाते ते माहिती नाही. सध्या आमदार फुटीच्या बातम्या  वाचनात येत आहेत. त्या बातम्यांमध्ये तथ्य नाही. माझ्या नावानेही एक बातमी चालवली गेली. पण, राज्यात अनेकजण पहिल्यांदाच निवडून आलेले असल्याने फुटाफुट होणार नाही. काहींनी पक्ष सोडल्यावर काय निकाल लागतो, हे साताऱ्यात सगळ्यांना दिसलंय. त्यामुळे आता कुणी असं करणार नाही. कर्नाटकचा निकाल काय लागला हेही जनतेने पाहिले आहे. जर कुठल्या पक्षाने कुठल्या पक्षाचे आमदार फोडले तर इतर तिन्ही पक्ष एकत्र येवून त्यांचा पाडाव करतील.'

पतंजलीच्या उत्पादनांविरोधात सोशल मीडियावर मोहीम

फडणवीस यांच्यासह या भाजप नेत्यांनी केलं बाळासाहेबांना अभिवादन

'अवकाळीची मदत तुटपुंजीच'
राज्यात सरकार स्थापनेचा फॉर्म्युला ठरला या बातम्यांमध्ये काहीही तथ्य नाही, असं सांगून पवार म्हणाले, 'अद्याप काहीही ठरलेलं नाही. याबद्दल त्या त्या पक्षाचे सर्वोच्च नेते निर्णय घेत नाहीत, तोपर्यंत या वावड्याच. आता १९ नोव्हेंबरला सोनिया गांधी आणि पवारसाहेबांची भेट होईल. त्यानंतर सगळे चित्र स्पष्ट होईल. आता अवकाळीनंतर शेतकऱ्यांना दिलेली मदत अतिशय तुटपुंजी आहे. प्रत्यक्ष नुकसान पाहून मदत दिली पाहिजे. सध्या राष्ट्रपती राजवट आहे.  त्यामुळे सगळे निर्णय केंद्रातून होतात. या पार्श्वभूमीवर आमचे सगळे खासदार याबद्दल केंद्रात आवाज उठवून शेतकऱ्यांना दिलासा देतील.'

'तोपर्यंत राष्ट्रपती राजवटच'
अजूनही भाजप सत्ता स्थापनेचा दावा करत आहे. त्यावर पवार म्हणाले, 'भाजपनं काय बोलावं हा त्यांचा प्रश्न.आज त्यांच्याकडे बहुमत असताना त्यांनी सत्ता स्थापन केली नाही. आम्ही विरोधी पक्षात बसण्याच्या मानसिकतेत होतो.  मात्र ,आता राष्ट्रपती राजवट लागल्यानंतर सत्तेबाबत मार्ग काढता येतोय का याबद्दल सगळेच प्रयत्न करतायत.  जोपर्यंत १४५ च्या पुढे आकडा होत नाही तोपर्यंत गोड बातमी येणार नाही आणि तोपर्यंत आपल्याला राष्ट्रपती राजवटीतच रहावं लागेल.'