
Urfi Javed Controversy : सुप्रिया ताईंनाही राहावेना उर्फी जावेदच्या कपड्यांबद्दल म्हणाल्या....
उर्फी जावेद हिच्या कपड्यांवरुन सुरू झालेला मुद्दा मागच्या काही दिवसांपासून चांगलाच चर्चेत आला आहे. उर्फीच्या कपड्यांवरून महाराष्ट्राचं राजकारणही आता तापू लागलं आहे. तिच्या या कपड्यांच्या स्टाईलवर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी आक्षेप घेत पोलिस कारवाई करण्याची मागणी केली आहे. त्यानंतर वाघ यांनी महिला आयोगालाही कारवाई करण्यासाठी मागणी केली. यावरून चित्रा वाघ आणि महिला आयोगाच्या अध्यक्षा आणि राष्ट्रवादीच्या नेत्या रूपाली चाकणकर आमनेसामने आल्या आहेत.
दरम्यान या सर्व प्रकरणावर राष्ट्रवादीच्या बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सुप्रिया सुले म्हणाल्या की, चित्रा वाघ आणि रुपाली चाकणकर यांच्यातील वादाबाबत मला काही माहिती नाही. मी अधिक वाचलेलं काही नाही. पण याबाबत वाचून, अभ्यास करून मी नक्की बोलेन. आज देशासमोर यापेक्षाही मोठे प्रश्न उभे आहेत ते प्रश्न सोडवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करायला हवेत, असंही सुप्रिया म्हणाल्या आहेत.
हे ही वाचा : प्राचीन काळातली शस्त्रनिर्मिती कला....
अभिनेत्री उर्फी जावेद प्रकरणावरुन महिला आयोग आणि भाजप नेत्या चित्रा वाघ आमने-सामने आल्या आहेत. चित्रा वाघ यांनी पत्रकार परिषद घेत उर्फी जावेदवर कारवाई प्रकरणी महिला आयोगावर प्रश्न चिन्ह उपस्थित केले होते. त्यानंतर महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी चित्रा वाघ यांना नोटीस पाठवली होती. या नोटीशीला चित्रा वाघ यांनी जाहीर उत्तर दिले आहे.
हेही वाचा: Chitra Wagh : "खुल्या समाजात उघडा नंगानाच..." ; महिला आयोगाच्या नोटिशीवर चित्रा वाघ यांचे जाहीर उत्तर