esakal | रिक्त पदांच्या भरतीबाबत धनंजय मुंडेंनी दिली माहिती; आश्वासनानंतर आंदोलन मागे
sakal

बोलून बातमी शोधा

Dhananjay_Munde

प्रलंबित राहिलेली सर्व कामे तसेच विविध स्तरावरच्या पदोन्नत्या, प्रशिक्षण विभागीय परीक्षा नजीकच्या कालावधीत पूर्णत्वास आणल्या जातील, असे मुंडे यांनी सांगितले. 

रिक्त पदांच्या भरतीबाबत धनंजय मुंडेंनी दिली माहिती; आश्वासनानंतर आंदोलन मागे

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : रास्त मागण्यासांठी सामाजिक न्याय विभाग हा संघटनेच्या पाठिशी आहे. परंतु कामाच्या कार्यक्षमतेबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही. रिक्त पदांची भरती, कामाचा बोजा हा सर्वच विभागांमध्ये आहे. पदे भरण्याबाबत शासन निर्बंध उठल्यानंतर पदांच्या भरतीबाबत तातडीने कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी दिले. दरम्यान, संघटनेने लेखणीबंद आंदोलन मागे घेत असल्याचे जाहीर केले. 

दिल्ली सीमेवर स्थानिक आणि शेतकऱ्यांमध्ये संघर्ष; पोलिसांना करावा लागला लाठीचार्ज​

सामाजिक न्याय मंत्री मुंडे यांच्या उपस्क्षितीत समाज कल्याण कर्मचारी गट (क) संघटनेची बैठक मुंबइत पार पडली. बैठकीत प्रधान सचिव शाम तागडे आणि समाज कल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे या वेळी उपस्थित होते. सामाजिक न्याय विभागामधील कामकाज कौतुकास्पद असून, कामाकाजाच्या अनुषंगाने प्रत्येक कर्मचा-याने स्वत:ची कौशल्य आणि कार्यक्षमता वाढवून प्रत्येक नागरिकांना न्याय देणे आवश्यक आहे. 

फक्कड बाबांनी राम मंदिरासाठी दिले १ कोटी; ६० वर्षांपासून राहत आहेत गुहेत!​

सामाजिक न्याय विभागाकडून योजनेचा लाभ तळागाळातील लाभार्थ्यांना मिळण्यासाठी अधिकारी आणि कर्मचारी यांनी एकदिलाने काम केले पाहिजे. कोरोनाच्या कालावधीमध्ये सामाजिक न्याय विभागाने केलेल्या कामाचे कौतुक केले. प्रलंबित राहिलेली सर्व कामे तसेच विविध स्तरावरच्या पदोन्नत्या, प्रशिक्षण विभागीय परीक्षा नजीकच्या कालावधीत पूर्णत्वास आणल्या जातील, असे मुंडे यांनी सांगितले. 

Budget 2021: बजेटमध्ये पेट्रोल-डिझेलचं काय होणार? पाहा व्हिडिओ

सामाजिक न्याय विभागातील कर्मचारी जसे कार्यालय अधिक्षक, वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक, समाज कल्याण निरीक्षक व सहायक लेखाधिकारी ही चार पदे महत्वाची आहेत. या पदधारकांना जबाबदारी त्याच प्रमाणे त्यांच्या सन्मानामध्ये वाढ करणे, त्यांना आवश्यक ते प्रशिक्षण देणे यासाठी एक प्रणाली तयार करण्यात येत असल्याचे समाज कल्याण आयुक्त डॉ. नारनवरे यांनी यावेळी सांगितले.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

loading image