मी सांगूनही बँकेने मला जाणीवपूर्वक नोटीस दिली : धनंजय मुंडे

Dhananjay Munde
Dhananjay Munde

बारामती : माझ्यावर शिवाजी बँकेचे 78 लाखांचे कर्ज आहे. त्यातील 22 लाख थकले आहेत. मी बँकेला सांगितलं होत, की 3 महिन्यांत निवडणूक झाल्यानंतर पाहू. मात्र एवढं सांगूनही नोटीस आली. माझ्यावर दर महिन्याला कसली कारवाई होते ते सर्वांना माहीत आहे. विरोधक कारवाई करतात, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.

बारामतीतील गोविंदबागेत आज पवार कुटुंबीय राज्यभरातून आलेल्या कार्यकर्त्यांची भेट घेत आहेत. धनंजय मुंडेही बारामतीत पोहचले असून, धनंजय मुंडे म्हणाले, की माझ्या फ्लॅटवर गेल्या तीन महिन्यांपासून कोणी नाही. दोन मुली आहेत त्यांना विचारलं, की नोटीस आली आहे का? तर ते बळच नोटीस देऊन गेल्याचे कळाले. त्यांनी काय कारवाई केली ते मी पाहणार असून, अशी कारवाई कोण करते आणि ही कारवाई जाणीवपूर्वक केली आहे का हे पाहावे लागेल.

पक्ष देईल ती जबाबदारी मी स्वीकारणार आहे. युवकांचा जोश निवडणूक सुरू होण्याच्या आधीपासून आहे. पवारसाहेबांच्या आव्हानावर तरुणाईने साथ दिली. माध्यमांमधून चर्चा सुरू होती की राष्ट्रवादी संपली. मात्र, युवकांनी हातात निवडणूक घेतली अशी चर्चा सुरू झाली. विधानसभेत येण्याची संधी मला मिळाली. संधी येणे आणि मिळणे फरक आहे. पक्ष जी जबाबदारी देईल ती मी घेईल, असे मुंडे यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com