राष्ट्रवादी काॅंग्रेसमध्ये भूकंप, आमदार मोहिते यांचा वेगळा विचार करण्याचा इशारा

chaskaman dam
chaskaman dam

चास (पुणे) : खेड तालुक्यातील भामा आसखेड धरणग्रस्तांच्या बाबतीत जे खरे सूत्रधार व एजंट आहेत, त्यांची व अधिकाऱ्यांची खरी माहिती बाहेर काढा. धरणग्रस्तांच्या पुनर्वसनाबाबत माझे सरकार असनूही ते लोकप्रतिनिधींची बाजू न घेता अधिकाऱ्यांची बाजू घेत असतील, तर उद्याच्या अधिवेशनात मी माझी भूमिका स्पष्टपणे मांडणार आहे. जर मला न्याय मिळाला नाही, तर कार्यकर्त्यांशी चर्चा करून मी वेगळा निर्णय घेणार आहे, असा इशारा आमदार दिलीप मोहिते यांनी दिला.

खेड तालुक्यातील चासकमान धरण शंभर टक्के भरले आहे. या धरणातील पाण्याचे पूजन शनिवारी (ता.  5) आमदार मेहिते यांच्या हस्ते श्रीफळ, पुष्प व साडी- चोळी अर्पण करून करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. या वेळी कार्यकारी अभियंता बाळासाहेब शेटे, सहायक अभियंता प्रेमनाथ शिंदे, सचिन शिंदे, सुप्रिया तनपुरे, शाखा अभियंता उत्तम राऊत, गणेश शितोळे, भिवसेन गुंडाळ, रोहिदास नाईकडे, उद्धव नाईकडे, तुळशीराम बोंबले, रघुनाथ कडलग, सुधीर नाईक, बाळासाहेब आनंदकर, हनुमंत कदम, सुनली तनपुरे, बाळू बोंबले, गणपत वाडेकर आदी उपस्थित होते.

भामा आसखेड धरणग्रस्तांच्या आंदोलनाबाबत मोहिते म्हणाले की, आंदोलनाचे जो नेतृत्व करतो, त्याने आंदोलनकर्त्यांच्या मागे उभे राहिले पाहिजे, मात्र त्या नेतृत्वाने आंदोलनाचा फायदा घेऊन स्वतःच्या झोळ्या भरल्यात. मलई खात त्यांनी मोक्याच्या जमिनी स्वतःच्या पदरात पाडून घेतल्यात. रखडलेल्या फाईल आता अधिकारी मार्गी लावत नसल्याने त्यांनी आंदोलनाचा मार्ग स्वीकारला व भोळ्या भाबड्या जनतेची फसवणूक करत आहेत. या नेत्यांच्या बाबतीतले सर्व पुरावे माझ्याकडे आहेत. वेळ आल्यावर त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी मी आग्रही राहणार आहे. गेली पंचवीस वर्ष मी सातत्याने पाठपुरावा करतोय की, पुनर्वसनात जे अधिकारी आहेत, जे एजंट आहेत, ते खरे सुत्रधार बाहेर काढा, त्यांची चौकशी करा.  

आमदार मोहिते म्हणाले की, चासकमान धरणातील गाळ काढणे अवघड आहे. त्यासाठी धरणांतर्गत पोटबंधारे घेतल्यास शेतकऱ्यांना शेतीसाठी उन्हाळ्यात पाणी उपलब्ध तर होईलच, पण त्यामध्ये गाळ साठल्यास तो शेतकऱ्यांच्या शेतासाठी उपयोगी होण्याबरोबरच तो काढणे सहज शक्य होईल.  धरणाच्या क्षमतेएवढा पाणीसाठा आज होत नाही. असे असताना सेझ व अन्य कारणासाठी चासकमान धरणातील शेतकऱ्यांच्या हक्काचे पाणी आरक्षित केले जात आहे. शेतकऱ्यांच्या हक्काचे पाणी आरक्षित होत असले, तर आम्ही गप्प बसणार नाही

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com