esakal | आम्ही कोणाचा धुरळा केलाय सर्वाना माहिती : रोहित पवार
sakal

बोलून बातमी शोधा

Rohit Pawar

या कार्यक्रमात विधानसभा निवडणुकीसंदर्भात अभिनेता अमेय वाघ याने रोहित पवार यांच्याशी बोलताना राजकारणावर वक्तव्य केले. अमेय वाघ म्हणाला, की महाराष्ट्राच्या राजकारणात वजिराला प्यादे समजले की काय होते, हे तुम्ही आणि तुमच्या पक्षाने दाखवून दिले आहे.

आम्ही कोणाचा धुरळा केलाय सर्वाना माहिती : रोहित पवार

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : वजिराला प्यादे समजल्यानंतर काय होते हे विधानसभा निवडणुकीत दिसले, यावर बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी आम्ही निवडणुकीत कोणाचा धुरळा केला, हे सर्वांना माहिती असल्याचे म्हटले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

रोहित पवार यांच्यामार्फत गेल्या काही वर्षांपासून सृजन फौंडेशनतर्फे विविध कलागुणांच्या स्पर्धांचे आयोजन करण्यात येते. याअंतर्गत सृजन म्युझिक फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात लवकरच प्रदर्शित होणाऱ्या धुरळा या मराठी चित्रपटाचे कलाकार सहभागी झाले होते.

जनगणना होणार, कागदपत्रे आणि बायोमेट्रिकची गरज नाही : जावडेकर

या कार्यक्रमात विधानसभा निवडणुकीसंदर्भात अभिनेता अमेय वाघ याने रोहित पवार यांच्याशी बोलताना राजकारणावर वक्तव्य केले. अमेय वाघ म्हणाला, की महाराष्ट्राच्या राजकारणात वजिराला प्यादे समजले की काय होते, हे तुम्ही आणि तुमच्या पक्षाने दाखवून दिले आहे. यावर बोलताना रोहित पवार म्हणाले, की तुमचा पिक्चर मी शंभर टक्के बघणार, कारण तुमच्या पिक्चरचे नाव धुरळा आणि आम्ही महाराष्ट्राच्या राजकारणात कोणाचा धुरळा केला आहे, हे सर्वांनी पाहिले आहे. 

loading image