रोहित पवार म्हणतात, मंत्रिमंडळात संधी मिळाली तर मी...

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 25 डिसेंबर 2019

महाआघाडीचे सरकार आले, मात्र अजून मंत्रिमंडळविस्तार झाला नाही. याच पार्श्वभूमीवर रोहित पवार म्हणाले की, मंत्रिमंडळात मला संधी मिळाली तर मी त्या संधीचं सोनं करून दाखवेल. मं

पुणे : नवनिर्वाचित आमदार रोहित पवार हे पुणे जिल्हा परिषद सदस्य असल्यापासूनच चर्चेत होते. शरद पवारांचे मार्गदर्शन आणि सामाजिक बांधिलकीमुळे त्यांनी कर्जत-जामखेडकरांची मनं जिंकली आणि आमदार म्हणून निवडून आले. आता ते पुन्हा एकदा त्यांच्या एका वक्तव्यामुळे चर्चेत आले आहेत. मंत्रिमंडळात मिळणाऱ्या संधीबाबात त्यांनी हे वक्तव्य केले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

महाआघाडीचे सरकार आले, मात्र अजून मंत्रिमंडळविस्तार झाला नाही. याच पार्श्वभूमीवर रोहित पवार म्हणाले की, मंत्रिमंडळात मला संधी मिळाली तर मी त्या संधीचं सोनं करून दाखवेल. मंत्रिमंडळात संधी द्यायची की नाही हा पूर्णपणे पक्षाचा निर्णय आहे, मी कोणतीही अपेक्षा न ठेवता काम करतो. मी माझ्या जिल्ह्याचा विचार प्रथम करतो. त्यामुळे पक्षाच्या निर्णयामुळे मला जर मंत्रिमंडळात संधी मिळाली तर मी त्याचं सोनं करेन असं रोहित यांनी सांगितलं.

अजित पवार आणि हर्षवर्धन पाटील आले एकत्र; काय झाली चर्चा?

मंत्रिमंडळ विस्ताराबाबत काँग्रेसशी चर्चा सुरू आहे. या चर्चेनंतर मंत्रीपदाचे वाटप होईल. या मंत्रिमंडळात नवीन चेहऱ्यांना संधी मिळू शकते, अशी शक्यता आहे.   


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NCP MLA Rohit Pawar speaks about Ministry