'पंतप्रधानांच्या स्वागतापासून राष्ट्रवादीच्या आमदारांना जाणीवपूर्वक दूर ठेवले'

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 7 डिसेंबर 2019

पंतप्रधान मोदी यांच्या स्वागतासाठी राज्यपाल भगतसिंग कोशियारी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. यावेळी भाजपचे राज्य उपाध्यक्ष योगेश गोगावले, महापौर मुरलीधर मोहोळ, भाजपचे सहा आमदार, गणेश बिडकर यांनाही पास देण्यात आला.

पुणे : पोलिस महासंचालक परिषदेसाठी पुण्यात आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागतासाठीच्या राजशिष्टानुसार आमदारांना पास मिळणे अपेक्षित होते. मात्र भाजपच्या सर्व आमदारांसह पदाधिकाऱ्यांना पास देण्यात आले, परंतु राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार सुनील टिंगरे व चेतन तुपे यांना संबंधीत यादीतून वगळण्यात आले, त्याबद्दल टिंगरे यांनी नाराजी व्यक्त केली. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप  

पंतप्रधान मोदी यांच्या स्वागतासाठी राज्यपाल भगतसिंग कोशियारी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. यावेळी भाजपचे राज्य उपाध्यक्ष योगेश गोगावले, महापौर मुरलीधर मोहोळ, भाजपचे सहा आमदार, गणेश बिडकर यांनाही पास देण्यात आला. परंतु राजशिष्टाचारानुसार, विद्यमान आमदारांना पोलिस प्रशासन पास देण्यात आले नाहीत. त्यामुळे सुनील टिंगरे हे विमानतळावर उपस्थित असूनही त्यांना पंतप्रधानांच्या स्वागतापासून दूर राहावे लागले. तुपे यांनी पास नसल्यामुळे विमानतळावर येण्याचे टाळले. तर टिंगरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे स्वागत केले. 

पुणे : सत्तास्थापनेनंतर पहिल्यांदाच मोदी-ठाकरेंची भेट

"पंतप्रधान नरेंद्र मोदी हे केवळ एका पक्षाचे नाहीत, तर पंतप्रधान हे पद संपुर्ण देशवासीयांचे असते. असे असतानाही त्यांच्या स्वागतासाठी राष्ट्रवादीच्या आमदारांना पास दिला गेला नाही, याऊलट भाजपच्या सर्व आमदारांसहीत पदाधिकाऱ्यांनाही पास वाटण्यात आले. लोकप्रतिनिधींबाबत करण्यात आलेला हा प्रकार निंदनीय आहे.'' अशा शब्दात सुनील टिंगरे यांनी आपली नाराजी व्यक्त केली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NCP MLA Sunil Tingare accuse to BJP for not meet PM Narendra Modi