Sharad Pawar : धमक्‍यांना घाबरू नका, तुमच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा आहे

'काही लोकांकडून कार्यकर्त्यांना दमदाटीचे, नोकरीवरून कमी करण्याचे फोन येत आहेत, धमक्‍या दिल्या जात आहेत, असे मला कार्यकर्त्यांनी सांगितले आहे.
Sharad Pawar
Sharad Pawar esakal

पुणे - 'काही लोकांकडून कार्यकर्त्यांना दमदाटीचे, नोकरीवरून कमी करण्याचे फोन येत आहेत, धमक्‍या दिल्या जात आहेत, असे मला कार्यकर्त्यांनी सांगितले आहे. पण काहीही झाले तरी, घाबरू नका, तुमच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा आहे.' अशा शब्दात राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी बारामती लोकसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांना मंगळवारी बळ दिले.

राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्यातर्फे झालेल्या बूथ पातळीवरील कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी खासदार सुप्रिया सुळे, माजी आमदार जगन्नाथ शेवाळे, प्रकाश म्हस्के, पुण्याचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप आदी उपस्थित होते. पवार यांनी लोकसभा निवडणुकीच्यादृष्टीने मतदारसंघाचा तालुकानिहाय आढावा घेतला.

बूथ कमिट्यांचा आढावा घेतला, त्याचबरोबर पक्ष नेमका कुठे कमी पडत आहे, मागील निवडणुकीमध्ये कुठे कमतरता राहून गेली होती, कार्यकर्त्यांनी घरोघरी मतदारांच्या भेटी घ्याव्यात, पक्षाच्या उमेदवारांची पत्रके, मतदारांच्या स्लीप प्रत्येक मतदारांपर्यंत पोचतील, याची योग्य ती काळजी घ्यावी, अशा शब्दात पवार यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.

काही कार्यकर्त्यांनी त्यांना दमदाटीचे, नोकरीवरून कमी करण्याचे फोन येत असल्याची तक्रार यावेळी केली. त्याबाबत पवार म्हणाले, 'कार्यकर्त्यांवर दबाव टाकला जात आहे, याची आम्ही गांभीर्याने नोंद घेतली आहे. आम्ही या प्रकरणाच्या खोलात जाणार आहोत. पक्षाच्या कार्यकर्त्यांना जर कोणी धमकावत असेल, तर मी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे, हे लक्षात ठेवा'.

सुप्रिया सुळे म्हणाल्या, 'आपल्या विरोधात कोण उमेदवार आहे, याचा विचार करू नका. बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये मागील 15 वर्षांपासून आपण काम करत आहोत. जनतेलाही आपण केलेल्या कामाची पूर्णपणे माहिती आहे. संसदेपासून मतदारसंघात केलेल्या प्रत्येक कामाचा जनता नक्कीच विचार करेल.'

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com