राष्ट्रवादीचे आता दबावाचे राजकारण

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 जानेवारी 2017

पुणे - महापालिका निवडणुकीत कॉंग्रेसबरोबर आघाडी करण्यासाठी जागावाटपावरून चर्चेचे गुऱ्हाळ सुरू असतानाच राष्ट्रवादी कॉंग्रेसने आता दबावाचे राजकारण सुरू केले आहे. आघाडीबाबत सकारात्मक चर्चा न झाल्यास उमेदवारी अर्ज भरण्याच्या पहिल्याच दिवशी (ता. 27) पहिली यादी जाहीर करण्याची तयारी राष्ट्रवादीने केल्याचे पक्षातील सूत्रांनी बुधवारी सांगितले. दरम्यान, पहिल्या यादीत विद्यमान नगरसेवकांसह 28 जणांचा समावेश असून, नव्याने पक्षात प्रवेश केलेल्या नगरसेवकांनाही स्थान दिल्याचे सांगण्यात येत आहे.

विरोधकांचे आव्हान असल्याने महापालिकेची निवडणूक आघाडी करून लढण्याची तयारी दोन्ही कॉंग्रेसने केली आहे. त्यानुसार दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये चर्चेच्या फेऱ्याही सुरू आहेत; परंतु जागावाटपाबाबत अद्याप एकमत होत नसल्याने बैठकांमध्ये तोडगा निघालेला नाही. समविचारी पक्षांना एकत्र घेऊन निवडणूक लढविण्याचे संकेत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार यांनी दोन दिवसांपूर्वी दिले आहेत. त्यानुसार स्थानिक पातळीवर दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये पुन्हा चर्चा होत असली तरी अधिक जागा पदरात पाडून घेण्यासाठी राष्ट्रवादीने दबावाचे राजकारण करण्याची भूमिका घेतल्याचे सांगण्यात येत आहे. सुरवातीला 46 जागा कॉंग्रेसला देण्याची तयारी दाखविलेल्या राष्ट्रवादीने आणखी 10 जागा वाढवून देण्याचा निर्णय घेतला आहे; परंतु किमान 65 जागा मिळाव्यात, यासाठी प्रयत्नशील असलेली कॉंग्रेस आपल्या भूमिकेवर ठाम आहे. त्यामुळे राष्ट्रवादीने ही भूमिका घेतल्याचे सांगण्यात येत आहे.
""नव्या रचनेतील ज्या-ज्या प्रभागांमध्ये पक्षांची ताकद आहे. त्यात विशेषत: विद्यमान नगरसेवक असलेले प्रभाग ताब्यात ठेवण्याच्या दृष्टीने बैठकीत चर्चा आहे. त्यानुसार कॉंग्रेसबरोबर बोलणी सुरू आहे. मात्र, अद्याप काही जागांबाबत एकमत होत नाही. पक्षाच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात येईल,'' असे राष्ट्रवादीतील सूत्रांनी स्पष्ट केले.

Web Title: NCP political pressure