

NCP Merger Talks Back In Focus After Viral Meeting Video
Esakal
अजित पवार यांच्या निधनानंतर आता दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याच्या चर्चा पुन्हा एकदा समोर येतायत. यातच शरद पवार यांनीही दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यावर चर्चा झाली होती आणि १२ फेब्रुवारीला त्यासंदर्भात घोषणाही केली जाणार होती असं स्पष्ट केलं होतं. अजित पवार यांनीच १२ तारीख ठरवलीली होती असंही शरद पवारांनी सांगितलं. आता विलिनीकरणाच्या चर्चेसाठी झालेल्या बैठकीचा व्हिडीओ समोर आला आहे. १७ जानेवारीला गोविंदबागेत शरद पवार, अजित पवार, जयंत पाटील, शशिकांत शिंदे यांच्यासह दोन्ही गटातील नेत्यांची बैठकीला उपस्थिती होती.