माळेगाव - 'माळेगाव`च्या निवडणूकीत पहिल्यांदाच अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने आणि शरद पवार पक्षाच्या इच्छुक उमेदवारांनी प्रचारात स्वतंत्र चुल मांडत गोवोगावी सभा, घोंगडी बैठका घेतल्या. मतासाठी अजित पवार की शरद पवार धरायचे, या विवंचनेत सभासद असतानाच आज शरद पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष अॅड. एस. एन. जगताप, गणपत देवकाते अजित पवार यांना भेटले.