शाईफेक प्रकरणी अद्याप कोणालाही अटक नाही

शाईफेक प्रकरणी अद्याप 
कोणालाही अटक नाही
Published on

लोणी काळभोर ता. १० : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते विकास सदाशिव लवांडे यांच्यावर शाईफेक करून त्यांना पिस्तुलाचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. याप्रकरणी अद्याप कोणाला अटक करण्यात आली नाही.
हा प्रकार शनिवारी (ता. ९) सकाळी दहाच्या सुमारास आळंदी म्हातोबाची (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीत घडला होता. याप्रकरणी लवांडे यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून संग्राम भंडारे, अक्षय कांचन यांच्यासह इतर १० ते १२ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांनी दिलेल्या माहितीनुसार याप्रकरणातील आरोपी निष्पन्न झाले असून त्यांना पकडण्यासाठी वरिष्ठांच्या आदेशानुसार दोन पथके पाठवण्यात आली आहेत. लवकरात लवकर त्यांना अटक करण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Students were educated about the POCSO Act, safe social media use, emergency helpline numbers and cybercrime prevention.
Police reached the spot in time, brought the situation under control and registered a case for disturbing public peace.
The crackdown is part of a sustained campaign to curb drug abuse and illegal narcotics activities in the Pune rural region.
Loni Kalbhor Police launched a special enforcement drive against illegal roadside parking on the Pune–Solapur National Highway and booked three drivers for obstructing traffic.
Marathi News Esakal
www.esakal.com