निवडणूक खर्चात राष्ट्रवादीची आघाडी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 28 एप्रिल 2017

भारतीय जनता पक्ष दुसऱ्या स्थानावर; ११ पक्षांचा शून्य खर्च

पिंपरी - महापालिका निवडणूक खर्चात राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीवर आहे. ‘राष्ट्रवादी’ने सर्वाधिक ७८ लाख ६९ हजार रुपये; तर भारतीय जनता पक्षाने ३५ लाख ६८ हजार रुपये खर्च केला आहे. शिवसेनेने ८ लाख ३४ हजार; तर काँग्रेसने फक्त २७ हजार २१८ रुपये खर्च केला. अन्य ११ पक्षांनी खर्चच केलेला नाही. रिपब्लिकन सेना आणि राष्ट्रीय समाज पक्षाने मुदतीत खर्च सादर न केल्याने त्यांच्याविरुद्ध राज्य निवडणूक आयोगाकडून कारवाई होऊ शकते.

महापालिकेसाठी २१ फेब्रुवारीला मतदान होऊन २३ फेब्रुवारीला निकाल जाहीर झाला. राजकीय पक्षांनी निकाल लागल्यापासून ६० दिवसांत निवडणूक खर्च सादर करणे आवश्‍यक आहे. ही मुदत नुकतीच संपली.

मुदतीत कक्षप्रमुख पद्मश्री तळदेकर यांच्याकडे १७ राजकीय पक्षांनी निवडणूक खर्चाची माहिती सादर केली. भाजप प्रदेश कार्यकारिणीने केलेला खर्च शहर भाजपने सादर केलेल्या निवडणूक खर्चात धरलेला नाही. प्रदेश भाजपचा खर्च राज्य निवडणूक आयोगाला कळविण्यात येणार आहे.

भारतीय कम्युनिस्ट पक्षाने १२ हजार ८४२ रुपये खर्च केला आहे. भारतीय रिपब्लिकन पक्षाने (आठवले गट) फक्त तीन रुपये खर्च केल्याची माहिती सादर केली. पक्षांनी केलेला खर्च संबंधित पक्षाच्या उमेदवारांवर विभागला जाणार असल्याने उमेदवारांनी यापूर्वी दिलेल्या खर्चात काही प्रमाणात वाढ होणार आहे. 

निवडणुकीत शून्य खर्च केलेले पक्ष
महाराष्ट्र नवनिर्माण सेना, बहुजन समाज पक्ष, बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पक्ष, समाजवादी पक्ष, जनता दल (धर्मनिरपेक्ष), भारतीय शेतकरी कामगार पक्ष, एमआयएम, भारिप-बहुजन महासंघ, अखिल भारतीय सेना, बहुजन मुक्ती पक्ष, भारतीय नवजवान सेना.

महापालिका निवडणुकीसाठी केलेला खर्च दोन राजकीय पक्षांनी मुदतीत सादर केलेला नाही. त्यांची नावे महापालिका निवडणूक कक्षामार्फत विभागीय आयुक्तांना दिली जातील. त्यांच्यामार्फत ही माहिती राज्य निवडणूक आयोगाला सादर केली जाईल. आयोग त्याबाबत पुढील कारवाई करेल. 
- पद्मश्री तळदेकर, कक्षप्रमुख, निवडणूक खर्च.

Web Title: ncp topper in election expenditure