खळबळजनक : राष्ट्रवादीसोबतच्या युतीवर देवेंद्र फडणवीसांचा मोठा गौप्यस्फोट

ncp was ready for alliance two years back devendra fadnavis
ncp was ready for alliance two years back devendra fadnavis
Updated on

पुणे : दोन वर्षांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसची आमच्या सोबत येण्याची तयारी होती, त्याबाबत चर्चाही झाली होती. मात्र आमच्या ज्येष्ठ नेत्यांनी शिवसेनेला डावलता येणार नाही, असं स्पष्ट केलं होतं. आपण काँग्रेसला एकटे पाडू. पण, शिवसेनेला सोडता येणार नाही, असं ज्येष्ठ नेत्यांनी स्पष्ट केलं होतं, असा धक्कादायक खुलासा, विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केला. पुण्यात पत्रकार परिषदेत ते बोलत होते. दुपारी त्यांनी पिंपरी-चिंचवड येथे वायसीएम रुग्णालयालाही भेट दिली. त्यानंतर त्यांनी पुण्यात पत्रकारांशी संवाद साधला.  

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

पुण्यात का आलो?
राज्य सरकारकडून कोरोना काळात पुण्याकडे दुर्लक्ष झाले आहे. कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठीच पुणे दौऱ्यावर आलो आहे, अशी माहिती फडवणीस यांनी पत्रकार परिषदेत दिली. राज्यात कोरोना वेगानं पसरतो आणि सरकारनं पुण्याकडं दुर्लक्ष केलंय, असा आरोप फडवणीस यांनी केला. तसेच केंद्रानं राज्य सरकारला याकाळात मोठी मदत केल्याचा दावा फडणवीस यांनी पुन्हा केला. 

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

  • पुण्याच कोरोना टेस्टिंग वाढवणे गरजेचे
  • राज्यात कोरोनाचा प्रादूर्भाव वेगाने होत आहे 
  • राज्य सरकारने पुणे महापालिकेला मदत करावी
  • मंत्रिमंडळ-अधिकारी यांच्यात समन्वय नाही
  • समन्वयाची जबाबदारी राज्याच्या प्रमुखांची
  • मनमानी निर्णयांमुळं कोरोनाची लढाई कमकूवत होतेय.
     

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com