Video : अभाविपच्या कार्यालयाच्या नामफलकाला राष्ट्रवादीनेच फासले काळे 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 7 जानेवारी 2020

प्रत्येक कार्यालयाला काळे फासणार 
विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस श्रीनिवास जगताप म्हणाले, "जेएनयू'मध्ये अभाविपने तोंडाला मास्क लावून विद्यार्थांवर हल्ले केले. त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही "मास्क एबीव्हीपी' ही मोहिम हातात घेतली आहे. राज्यातील अभाविपच्या सर्व कार्यालयांच्या नामफलकावर काळे फासले जाणार आहे.'' 

पुणे : 'जेएनयू'मध्ये झालेल्या हल्ल्यावरून डाव्या आणि उजव्या संघटनांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू असताना मंगळवारी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या सदाशिव पेठेतील कार्यालयाच्या नामफलकास काळे फासल्याने नवा वाद निर्माण झाला.

Video : पुण्यात अभविप कार्यालयाच्या नामफलकाला फासले काळे

अभाविपतर्फे मंगळवारी सकाळी आबासाहेब गरवारे महाविद्यालयाच्या आतमध्ये डाव्या संघटनांच्या विरोधात आंदोलन करून केले. यावेळी माओवाद हो बर्बाद.... नक्षलवाद हो बर्बाद... भारत माता की जय...' अशी घोषणाबाजी केली. यावेळी महाविद्यालयातील कार्यकर्ते, विद्यार्थी सहभागी झाले होते. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

दरम्यान, दुपारी 12च्या सुमारास राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सदाशिव पेठेतील अभाविपच्या कार्यालयावर जाऊन तेथील नामफलकास काळे फासले. हा प्रकार घडल्याचे कळताच अभाविपचे कार्यकर्ते व पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. महामंत्री अनिल ठोंबरे म्हणाले, आम्ही लोकशाही पद्धतीने आंदोलन करत आहोत, पण राष्ट्रवादीचे गुंड अशा प्रकारे सत्तेचा गैरवापर करून दहशत निर्माण करत आहेत. याविरोधात पोलिसांकडे तक्रार केली जाईल. तर, काळे फासणाऱ्यांचा शोध घेतला जात असल्याचे पोलिस निरीक्षक दादासाहेब चुडाप्पा यांनी सांगितले. 

Video : JNU attack : जेएनयू हल्लाप्रकरणी विद्यार्थी एकवटले 

प्रत्येक कार्यालयाला काळे फासणार 
विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस श्रीनिवास जगताप म्हणाले, "जेएनयू'मध्ये अभाविपने तोंडाला मास्क लावून विद्यार्थांवर हल्ले केले. त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही "मास्क एबीव्हीपी' ही मोहिम हातात घेतली आहे. राज्यातील अभाविपच्या सर्व कार्यालयांच्या नामफलकावर काळे फासले जाणार आहे.'' 

 

"सत्तेत आले की माज करायचा, सत्ता नसली की बिळात जाऊन बसायचे ही राष्ट्रवादीची प्रवृत्ती आहे. तिघाडी सरकारचा आम्ही नक्की समाजार घेऊ'' 
राम सातपुते, आमदार, भाजप 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ncp workers attacked abvp office blackened their board in Pune