महाजनादेश पाठोपाठ राष्ट्रवादीची शिवस्वराज्य यात्राही थांबणार

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 8 ऑगस्ट 2019

पुणे : "राज्यातील दुष्काळी भागांतील लोकांच्या संवादासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसची शिवस्वराज्य यात्रा आहे. ती दुष्काळी भागापुरतीच असून, त्यानंतर थांबविण्यात येईल, असे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी गुरुवारी पुण्यात स्पष्ट केले. पुरामुळे लोकांचे प्रचंड नुकसान झाले असून, त्यांना सावण्यासाठी आता उणीदुणी बाजूला ठेवून सगळ्यांनी एकत्र यावे, असे आवाहनही पवार यांनी केले. 

पुणे : "राज्यातील दुष्काळी भागांतील लोकांच्या संवादासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसची शिवस्वराज्य यात्रा आहे. ती दुष्काळी भागापुरतीच असून, त्यानंतर थांबविण्यात येईल, असे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी गुरुवारी पुण्यात स्पष्ट केले. पुरामुळे लोकांचे प्रचंड नुकसान झाले असून, त्यांना सावण्यासाठी आता उणीदुणी बाजूला ठेवून सगळ्यांनी एकत्र यावे, असे आवाहनही पवार यांनी केले. 

राज्यातील काही जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण होऊन घरे, शेती आणि उद्योगांचे नुकसान झाले आहे. या पार्श्‍वभूमीवर पवार पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली. राजकीय मतभेद न आणता पूरग्रस्तांच्या मदतीची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. दरम्यान, पुरस्थिती असतानाही राज्याती राजकीय पक्षांनी वेगवेगळ्या स्वरुपाच्या यात्रा काढल्या आहेत. त्या थांबून आता लोकांची मदत करायला हवी का, असा प्रश्‍न विचारताच पवार यांनी राष्ट्रवादीच्या यात्रेचा उद्देश आणि तो पूर्ण करून लगेचच थांबविण्यात येईल, असे जाहीर केले. 

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाजनादेश यात्रा काढली आहे. तर राष्ट्रवादी कॉंग्रेसने खासदार डॉ. अमोल कोल्हे आणि खासदार उदन राजे भोसले यांच्या माध्यमातून शिवस्वराज्य यात्रेला प्रारंभ केला. 

पवार म्हणाले. ""पुरामुळे घरे आणि शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे येथील शेतकरी अडचणीत सापडला आहे. या भागांत अशी स्थिती कधीच ओढविली नव्हती. पुराचे पाणी ओसरताच राज्य सरकारने पंचनामे करून लोकांना तातडीची मदत करावी. राजकीय मतभेद, टिका-टिप्पणी बाजूला ठेवून मदतीसाठी धावले पाहिजे. कर्नाटक सराकरनेही आता वाद करण्यापेक्षा मदतीचा विचार करावा. अलमट्टी धरणातून किती पाणी सोडायचे याचे नियाजेन तज्ज्ञांकडून केले जाते. पाणी सोडल्यानंतर पुढे साठविण्याची क्षमता किती आहे ? याचाही विचार केला पाहिजे. मात्र, यासंदर्भातील महाराष्ट्राची भूमिका योग्य आहे.'' 

"पूरग्रसतांच्या मदतीसाठी पक्षाचे आमदार-खासदार आणि अन्य पक्षांच्या मानधतानू 50 लाख रुपये देण्यात येणार आहेत. तसेच, राष्ट्रवादीच्या डॉक्‍टर सेलच्या वतीनेही लोकांना आरोग्य सुविधा पुरविण्यात येतील, असेही पवार यांनी स्पष्ट केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NCPs Shivsvarajya will be stop declared Sharad pawar