राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षाची शिवसेनेच्या माजी खासदारांवर टीका, पराभव पचनी पडत नसल्याचा टोला

संदेश शहा
Wednesday, 23 September 2020

राज्यात महाआघाडीचे सरकार आहे. त्यामध्ये शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्रित काम करत आहे. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रदिप गारटकर यांच्यावर टीका करताना शिवसेनेचे जिल्हा परिषदेतील गटनेते देविदास दरेकर यांनी भान राखणे गरजेचे आहे. त्यांनी दिलगिरी व्यक्त न केल्यास इथून पुढे जशास तसे उत्तर दिले जाईल, असा इशारा राष्ट्रवादीचे इंदापूर तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे यांनी दिला.

इंदापूर (पुणे) : राज्यात महाआघाडीचे सरकार आहे. त्यामध्ये शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्रित काम करत आहे. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रदिप गारटकर यांच्यावर टीका करताना शिवसेनेचे जिल्हा परिषदेतील गटनेते देविदास दरेकर यांनी भान राखणे गरजेचे आहे. त्यांनी दिलगिरी व्यक्त न केल्यास इथून पुढे जशास तसे उत्तर दिले जाईल, असा इशारा राष्ट्रवादीचे इंदापूर तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे यांनी दिला. आढळराव पाटील यांचा पराभव पचनी पडला नाही. त्यामुळे दरेकर हे बेताल वक्तव्य करत आहेत. त्यांची गारटकर यांच्यावरील टीका दुर्दैवी व निषेधार्ह आहे. 

ग्राहक खायला येईनात, बारला परवानगी द्या; व्यावसायिकांची मागणी

इंदापूर काँग्रेस भवनमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत कोकाटे यांनी दरेकर यांनी गारटकर यांच्यावर केलेल्या टीकेचा खरपूस समाचार घेतला. या वेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे इंदापूर तालुका कार्याध्यक्ष अतुल झगडे, छत्रपती कारखान्याचे उपाध्यक्ष अमोल पाटील, बाळासाहेब करगळ, वसंत आरडे, तात्यासाहेब वडापुरे आदी उपस्थित होते.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

कोकाटे म्हणाले की, शिवसेना नेते शिवाजीराव आढळराव पाटील यांचा लोकसभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे अमोल कोल्हे यांनी पराभव केला. कोल्हे यांच्या विजयात गारटकर यांचा सिंहाचा वाटा आहे. आढळराव पाटील यांचा पराभव पचनी पडला नाही. त्यामुळे दरेकर हे बेताल वक्तव्य करत आहेत. त्यांची गारटकर यांच्यावरील टीका दुर्दैवी व निषेधार्ह आहे. 

पुण्यातील महत्त्वाकांक्षी प्रकल्पांचे काम थंडावले

अतुल झगडे म्हणाले, ‘‘विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस अशी महाविकास आघाडी सत्तेत आहे. वरिष्ठ नेत्यांचा आदर ठेवून सर्वांनी एकमेकास पूरक अशी भूमिका घेतली पाहिजे. गारटकर हे ज्येष्ठ नेते असताना दरेकर यांची टीका चुकीची आहे. त्यांच्या मागे बोलवता धनी कोण आहे, हे सर्वांना माहीत आहे. त्यामुळे दरेकर यांनी भान न बाळगल्यास इथून पुढे जशास तसे उत्तर दिले जाईल.‘‘


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NCP's taluka president criticizes former Shiv Sena MPs, claims that defeat is not digestible