esakal | विश्र्वातील दुर्मिळ महास्फोटाचे वातावरण टिपण्यात पुण्यातील NCRAच्या शास्त्रज्ञांना यश

बोलून बातमी शोधा

The atmosphere of the rare Big Bang in the universe
विश्र्वातील दुर्मिळ महास्फोटाचे वातावरण टिपण्यात पुण्यातील NCRAच्या शास्त्रज्ञांना यश
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : विश्वातील सर्वात वेगवान पद्धतीने ऊर्जा उत्सर्जित करणाऱ्या दुर्मिळ महास्फोटाचे वातावरण टिपण्यात भारतीय शास्त्रज्ञांना यश आले आहे. जगात प्रथमच शास्त्रज्ञांना ही घटना टिपता आली आहे. पुण्यातील राष्ट्रीय रेडिओ खगोलभौतिकी केंद्राच्या (एनसीआरए) प्रा.पूनम चंद्रा आणि त्यांच्या माजी संशोधक (पीएचडी) विद्यार्थी डॉ.ए.जे. नयना यांनी हे संशोधन केले आहे. अतिशय दुर्मिळ आणि महत्त्वपूर्ण असलेली ही घटना टिपण्यासाठी शास्त्रज्ञांनी खोडद येथील अद्ययावत जायंट मीटरवेव्ह रेडिओ टेलिस्कोपचा (युजीएमआरटी) वापर केला आहे. फास्ट ब्ल्यू ऑप्टिकल ट्रान्झियंट (एफबीओटी) नावाने ओळखले जाणाऱ्या या स्फोटांपैकी ‘एटी २०१८ काउ’ या स्फोटाचे वातावरण शास्त्रज्ञांनी अभ्यासला आहे.

- काय आहे संशोधन ?

विश्वाची निर्मिती नक्की कशी झाली, त्याचे अंतरंग काय आहे. याचे कुतूहल सर्वसामान्यांसह शास्त्रज्ञांनाही आहेत. त्यामुळे विश्वात दिसणाऱ्या विविध अवकाशीय घटनांचा अभ्यास शास्त्रज्ञ करत असतात. त्यातीलच एक दुर्मिळ स्फोटाची घटना जी ‘एफबीओटी’ नावाने ओळखली जाते. ती टिपण्यात शास्त्रज्ञांना यश आले. ‘एटी २०१८ काउ’ नावाची ही घटना आहे.

हेही वाचा: आमदार चेतन तुपे यांचा राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षपदाचा राजीनामा

संशोधनात विशेष काय?

‘एफबीओटी’ नावाचे हे स्फोट शोधणे अवघड असते. कारण ते दिसतात आणि लवकरच अदृश्यही होतात. असे जरी असले तरी यातील काही एफबीओटींचा शोध संपूर्ण आकाशाचे स्कॅन करताना लागला आहे. त्यातही रेडिओ लहरींचे उत्सर्जन करणारे असे स्रोत दुर्मिळ आहे. असे असतानाही भारतीय शास्त्रज्ञांनी ही कामगिरी फत्ते केली आहे.

‘एटी २०१८ काउ’ची वैशिष्ट्ये काय?

एफबीओटी एटी २०१८ काउ चा शोध १६ जून २०१८ रोजी लागला. सुमारे २१५ दशलक्ष प्रकाशवर्षे अंतरावरील या ‘काउ’ ने सामान्य सुपरनोव्हापेक्षा जास्त प्रकाश उत्सर्जित केला. या ‘काउ’च्या स्फोटाभोवतीची सामग्रीची घनता उत्सर्जनाच्या क्षणापासून ०.१ प्रकाशवर्षाच्या आसपास तीव्रतेने घसरते. याचाच अर्थ हा काउ ज्या ताऱ्यापासून तयार झाला. तो तारा जीवनाच्या शेवटच्या टप्प्यात जास्त वेगाने वस्तुमान कमी करत होता. तसेच, या स्फोटानंतर २५७ दिवसानंतरही त्यातील सामग्री प्रकाशाच्या गतीपेक्षा २० टक्के अधिक फिरत आहे. आणि ती गती अजूनही कमी होत नाही.

हेही वाचा: पहिला डोस जोमात, दुसरा कोमात!

img

The atmosphere of the rare Big Bang in the universe

हेही वाचा: बापरे! कोरोनातून बरे झालेल्या काही रुग्णांना होतोय नवीनच आजाराचा त्रास

कसे झाले संशोधन ?

दोन वर्षांपासून एनसीआरएचे हे दोन शास्त्रज्ञ अद्ययावत जीएमआरटीच्या साहाय्याने ‘काउ’चे गुणधर्म शोधत आहे. या विस्फोटातून दीर्घकाळ रेडिओ लहरींचे उत्सर्जन होत आहे. शास्त्रज्ञांनी रेडिओ दुर्बिणीच्या साहाय्याने यावर लक्ष ठेवले. त्यातून मिळालेल्या माहितीच्या आधारे विस्मयकारक निष्कर्ष हाती लागले आहेत.

एफबीओटी ‘एटी २०१८ काउ’च्या निरीक्षणावरून असे दिसते की, स्फोटापुर्वीच्या २३ वर्षांच्या तुलनेत या काउच्या पुर्वजाने जीवनाच्या शेवटच्या टप्प्यात १०० पट वेगाने पदार्थ उत्सर्जित केली. तसेच यातून उत्सर्जित होणाऱ्या भागात असमानता दिसली. मात्र इतर दोन एफबीओटी या गुणधर्मांना दर्शवत नाही. त्यामुळे हे संशोधन विशेष बनले आहे.

- प्रा. पूनम चंद्रा, शास्त्रज्ञ, एनसीआरए, पुणे.