
पुणे : एक वर्ष पूर्णवेळ बी.एड. आणि एम.एड. अभ्यासक्रम पुन्हा सुरू करण्याचा प्रस्ताव राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदेने (एनसीटीई) सादर केला आहे. या नव्या प्रस्तावानुसार शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पासून हे दोन्ही अभ्यासक्रम एक वर्ष कालावधीसाठी राबविण्याचा नवीन प्रस्ताव सादर केला आहे.