antriksh kumar sinh
sakal
पुणे
Pune News : राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत एनडीए कॅडेटने संपविले जीवन
राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत (एनडीए) पहिल्या वर्षात प्रशिक्षण घेत असलेल्या कॅडेटने गळफास घेऊन जीवन संपविल्याची घटना शुक्रवारी (ता. १०) पहाटे उघडकीस आली.
पुणे - राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत (एनडीए) पहिल्या वर्षात प्रशिक्षण घेत असलेल्या कॅडेटने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी (ता. १०) पहाटे उघडकीस आली. अंतरिक्ष कुमार सिंह (वय-१८) असे या कॅडेटचे नाव आहे. घटनेमागील नेमके कारण शोधण्यासाठी कोर्ट ऑफ इन्क्वायरी (चौकशी) नेमण्यात आली आहे.