‘नीट’प्रकरणी आता मालमत्तेचा शोध

‘नीट’प्रकरणी आता
मालमत्तेचा शोध
Published on

पुणे, ता. २० : नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणातील आरोपींची आर्थिक कोंडी करण्यास केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (सीबीआय) आणि सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) सुरुवात केली आहे. या प्रकरणात अटक केलेल्या आरोपींच्या मालमत्तेची माहिती नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाकडून मागविली आहे. ‘नीट’ पेपरफुटी प्रकरण सध्या देशभरात गाजत आहे. या प्रकरणात आतापर्यंत महाराष्ट्रातील तीनहून अधिक जणांना अटक झाली. अटक करण्यात आलेल्यांच्या मालमत्तेची माहिती जमा करण्याचे काम ‘सीबीआय’ने सुरू केले आहे. त्यासाठी ‘सीबीआय’चे अधिकारी गेल्या दोन दिवसांपासून नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाच्या कार्यालयात येऊन माहिती घेत असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. त्यामध्ये आरोपींच्या नावावर कुठे आणि किती स्थावर मालमत्ता आहे, यांची माहिती घेतली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com