रांका ज्वेलर्सने साकारला नेकलेस कम गोल्डन मास्क

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 15 July 2020

रांका ज्वेलर्सने नावीन्यता व कलाकुसरीचा एक अद्वितीय नजराणा सादर केला आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी महत्त्वपूर्ण असलेला एन-९५ मास्कची सुवर्ण कलाकृती रांका ज्वेलर्सने घडविलेली आहे. या कलाकृतीचे वैशिष्ट्य म्हणजे आत्ता तुम्ही हा मास्क म्हणून वापरू शकता आणि नंतर नेकलेस म्हणूनही परिधान करू शकता. २२ कॅरेट सोन्यामध्ये घडविण्यात आलेल्या या ‘नेकलेस (चोकर) कम गोल्डन मास्क’चे वजन अवघे १२४.५ ग्रॅम आहे.

पुणे - रांका ज्वेलर्सने नावीन्यता व कलाकुसरीचा एक अद्वितीय नजराणा सादर केला आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी महत्त्वपूर्ण असलेला एन-९५ मास्कची सुवर्ण कलाकृती रांका ज्वेलर्सने घडविलेली आहे. या कलाकृतीचे वैशिष्ट्य म्हणजे आत्ता तुम्ही हा मास्क म्हणून वापरू शकता आणि नंतर नेकलेस म्हणूनही परिधान करू शकता. २२ कॅरेट सोन्यामध्ये घडविण्यात आलेल्या या ‘नेकलेस (चोकर) कम गोल्डन मास्क’चे वजन अवघे १२४.५ ग्रॅम आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

श्‍लोक रांका म्हणाले, ‘‘आम्ही कायमच नावीन्यता आणि ग्राहकांचे समाधान यावर विशेष भर देतो. प्रत्येक काळात सर्वोत्कृष्ट गुणवत्ता, कल्पक डिझाईन आणि ग्राहकांच्या आनंदाला आमच्याकडे प्राधान्य असते. यापूर्वीही रांका ज्वेलर्सने सोन्याचा शर्ट, सोन्याची पैठणी आणि सोन्यातली शालही घडवून आपल्या प्रतिभेचा आविष्कार सर्वांना दाखविला आहे. पुण्यातील मानाच्या गणपती बाप्पासाठीही चांदीचे सुबक सिंहासन घडवून भक्तांना आनंदित केले आहे.’’ 

कोरोना बाधितांना बेड्स, रुणवाहिकांबाबत अडचण असल्यास हेल्पलाइन जारी

अरे बापरे ! हवेली तालुक्याने गाठला हजाराचा टप्पा

श्‍वास घेण्यासाठी खास जाळ्या
मास्क पुन्हा पुन्हा वापरता येऊ शकतो. सोनेरी मास्क लवचिक असून कोणत्याही व्यक्तीला व्यवस्थितपणे परिधान करता येऊ शकतो. या मास्कमधून श्‍वास घेता यावा, यासाठी सोन्याच्या बारीक जाळ्यांची खास निर्मिती करण्यात आलेली आहे. अशा प्रकारचे डिझाईन हे टर्किश स्टाईलमध्ये पाहावयास मिळते. हा मास्क स्वच्छ करण्यासाठी युव्ही सॅनिटायझर बॉक्‍स ग्राहकांना भेट म्हणून देतात. मास्क बनविण्यासाठी कारागिरांना दोन आठवडे लागले. या अप्रतिम आणि अद्वितीय सोनेरी मास्कची किंमत ६.५ लाख इतकी आहे.

 

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Neckless cum golden mask making by ranka jewellers