दिव्यांगांसाठी काम करणाऱ्या तज्ञांनी सतत सजग राहण्याची गरज - रक्षा देशपांडे

संदीप जगदाळे
सोमवार, 20 ऑगस्ट 2018

हडपसर - दिव्यांगाचे शिक्षण, प्रशिक्षण आणि पुर्नवसन क्षेत्रात कार्य करणा-या तज्ञ व्यक्तींनी सातत्याने नवीन ज्ञान मिळविण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्यासाठी निरंतर पुर्नवसन प्रशिक्षण कार्यक्रमाची आवश्यकता आहे, असे मत रिहॅबीलिटेशन काउंन्सील ऑफ इंडियांच्या झोनल समन्वयक रक्षा देशपांडे यांनी व्यक्त केले. 

लर्निंग डिसअॅबीलिटी असेसमेंन्ट अॅण्ड इंटरव्हेनशन या विषयावर आयोजीत पाच दिवशीय निरंतर पुर्नवसन प्रशिक्षण कार्यक्रमाच्या उदघाटनप्रसंगी देशपांडे बोलत होत्या. याप्रसंगी रिहॅबीलिटेशन काउंन्सील ऑफ इंडियांचे प्रादेशीक मेंबर संतोष गायकवाड, इंडियन असोसिएशन ऑफ हेल्थ रिसर्च अॅण्ड वेलफेअरचे अध्यक्ष सुनील सैनी, प्रा. महेंद्र देवकर, डॅा. विशाल गाणार, प्राचार्य चंद्रकांत भोसले, सिपा फौंडेशनचे अध्यक्ष तुषार भालेराव, विश्वस्त रावसाहेब कांबळे उपस्थित होते. 

या प्रशिक्षणासाठी महाराष्ट्र राज्यासह देशभरातील विविध राज्यातील 100 प्रशिक्षणार्थी सहभागी झाले आहेत. यामध्ये विशेष शिक्षक, वाचा उपचार तज्ञ, सायकोलॅाजिस्ट, सामाजिक कार्यकर्ते, फिजीओथेरपीस्ट यांचा समावेश आहे. 

Web Title: Need to be constantly aware of experts working for the volunteers - Defense Deshpande