पुणे : देशी गाईंच्या संवर्धनाची गरज

गोपालक, गोशाळाचालक परिसंवादात काडसिद्धेश्‍वर महाराजांचे प्रतिपादन
पुणे : देशी गाईंच्या संवर्धनाची गरज
पुणे : देशी गाईंच्या संवर्धनाची गरजsakal

पुणे : ‘‘देशातील पंजाब, हरियाना, उत्तर प्रदेश, राजस्थान, गुजरात आणि आंध्र प्रदेश या राज्यांतील देशी गाईंच्या पारंपरिक जाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. या राज्याच्या तुलनेत सध्या महाराष्ट्रातील देशी गाईंची स्थिती थोडी बरी आहे. राज्यातील देशी गाईंच्या सहा ते सात प्रजाती बऱ्यापैकी तग धरून आहेत. परंतु, या देशी गाईंच्या प्रजातीचे संवर्धन होणे गरजेचे आहे,’’ असे प्रतिपादन कोल्हापूर येथील कणेरी मठाचे श्री काडसिद्धेश्‍वर महाराज यांनी पुण्यात केले.

महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या पुणे येथील कृषी महाविद्यालयाचा पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विभाग आणि देशी गोवंश संशोधन व प्रशिक्षण केंद्रातर्फे पुण्यात ‘देशी गोपालक व गोशाळा चालक’ परिसंवाद आयोजित केला होता. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांतकुमार पाटील, कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय सावंत, महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. सुनील मासळकर, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील डॉ. स्मिता सोळंकी, परभणी पशुवैद्यकीय महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. नितीन मार्कंडेय, कृषी महाविद्यालयाच्या पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विभागाचे प्रा. देवदत्त हजारे आदी उपस्थित होते.

पुणे : देशी गाईंच्या संवर्धनाची गरज
मलिकांच्या आरोपांनंतर वानखेडेंची चौकशी होणार? गृहमंत्री म्हणाले...

कोणत्याही संशोधनाचे दुष्परिणाम दिसून येण्यासाठी काही वर्षांचा कालावधी जावा लागतो. तसाच प्रकार हरितक्रांतीच्या बाबतीत घडला आहे. या हरितक्रांतीचे आता परिणाम दिसू लागल्याचे मान्य करावे लागणार आहे. त्यामुळे संशोधनाची नव्याने मांडणी व विज्ञानावर आधारित संशोधन करावे लागेल, असे मत काडसिद्धेश्‍वर महाराजांनी व्यक्त केले.

कुलगुरू डॉ. पाटील म्हणाले, ‘‘राज्य सरकारच्या माध्यमातून हे देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्र साकारले जात आहे. सरकारने यासाठी मोठी आर्थिक मदत केली आहे. त्यामुळे महाविद्यालयात विविध उपक्रम सुरू केले आहे. संगोपन व प्रशिक्षण याला विज्ञानाची जोड देण्यासाठी हे केंद्र महत्त्वाचे ठरेल. त्यामध्ये गोमूत्र, शेण, गाईवर संशोधन केले जाणार आहे.’’

दापोली कृषी विद्यापीठातही गोपालनाचा विस्तार केला जाईल. गोपालनामुळे गाईच्या शेणापासून विविध वस्तू बनविल्या जातात. कोकणात कपिला गाईचे ब्रीड रजिस्टर केले आहे. त्याचा गोधन संवर्धन करण्यासाठी मोठा फायदा होईल, असे मत कुलगुरू डॉ. सांवत यांनी व्यक्त केले. या केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. सोमनाथ माने यांनी प्रास्ताविक केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com