सहकार क्षेत्राच्या सक्षमीकरणाची गरज : चंद्रकांत पाटील

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 14 डिसेंबर 2019

सामान्य खातेधारक आणि कर्जदारांसाठी सहकारी बँका हा महत्त्वाचा दुवा असून, सहकारी क्षेत्राचे सक्षमीकरण करण्याची गरज आहे, असे मत भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले.

पुणे : सामान्य खातेधारक आणि कर्जदारांसाठी सहकारी बँका हा महत्त्वाचा दुवा असून, सहकारी क्षेत्राचे सक्षमीकरण करण्याची गरज आहे, असे मत भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

कोथरूडचे आमदार म्हणून निवडून आल्यावर उद्यम विकास सहकारी बॅंकेच्या वतीने त्यांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी संचालक मंडळाशी चर्चा करताना त्यांनी उद्यम सहकारी बँकेने सातत्याने 'अ' दर्जा टिकविल्याबद्दल समाधान व्यक्त केले.

शिवसेनेवरचा अतिविश्वास नडला : फडणवीस

दरम्यान, संचालक मंडळाच्या सचोटीचे व विपरीत परिस्थितीत नेटाने काम करण्याच्या चिकाटीचे कौतुक केले. शेतकऱ्यांप्रमाणेच उद्योजकांनासुद्धा अनुदान देण्याची योजना आपण आखली होती असे त्यांनी नमूद केले.

ऑनलाईन व्यवहारात तरुणीला चार लाखांचा गंडा

यावेळी उद्यम विकास सहकारी बॅंकेच्या २०२० सालच्या कॅलेंडरचे प्रकाशन पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी 
बॅंकेचे अध्यक्ष महेश लडकत, उपाध्यक्ष शिरीष कुलकर्णी, माजी अध्यक्ष व संचालक संदीप खर्डेकर, लीनाताई अनास्कर, तज्ञ संचालक दिनेश गांधी, महेंद्र काळे, दिलीप उंबरकर, पी. के. कुलकर्णी, मनोज नायर, गोकुळ शेलार, सीताराम खाडे, राजन परदेशी, मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक देशपांडे व कर्मचारी उपस्थित होते. अध्यक्ष महेश लडकत व उपाध्यक्ष शिरीष कुलकर्णी यांच्या हस्ते पाटील यांचा सत्कार करण्यात आला.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Need for Empowerment of Cooperation Sector says Chandrakant Patil