बदलत्या काळात मुलांवर संस्काराची गरज: उदयसिंह पाटील यांचे सांगवीत प्रतिपादन

रमेश मोरे
शुक्रवार, 24 ऑगस्ट 2018

आई वडीलांचे वागणे नकळत मुलांवर संस्कार घडवून जाते. म्हणुन बदलत्या काळात आई वडीलांनी जबाबदारीचे भान राखुन मुलांवर योग्य संस्कार करावेत असे जुनी सांगवी येथे शकुंतलाबाई शितोळे शाळेच्या विद्यार्थी गुणगौरव समारंभात जनकल्याण सामाजिक सेवा संस्था कोल्हापुरचे अध्यक्ष उदयसिंह पाटील यांनी बोलताना व्यक्त केले.

जुनी सांगवी - टि. व्ही., मोबाईल, डिजेच्या काळात आई वडील मुलांना मुभा देतात. याचा विपरीत परिणाम विद्यार्थ्यांच्या जडणघडणीवर होतो. बदलत्या काळात आई वडील पालकही बदलले आहेत. आई वडीलांचे वागणे नकळत मुलांवर संस्कार घडवून जाते. म्हणुन बदलत्या काळात आई वडीलांनी जबाबदारीचे भान राखुन मुलांवर योग्य संस्कार करावेत असे जुनी सांगवी येथे शकुंतलाबाई शितोळे शाळेच्या विद्यार्थी गुणगौरव समारंभात जनकल्याण सामाजिक सेवा संस्था कोल्हापुरचे अध्यक्ष उदयसिंह पाटील यांनी बोलताना व्यक्त केले.

पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत गुणवत्ता यादीत आलेल्या विद्यार्थ्यांच्या गुणगौरव समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. आला. यावेळी संस्थेचे तुळशीराम नवले, रामभाऊ खोडदे, सतीश साठे देशमुख परशुराम मालुसरे, सातारा मित्र मंडळाचे संजय चव्हाण, सोमनाथ कोरे उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिवाजी माने यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन दत्तात्रय जगताप यांनी केले. तर आभार भाऊसाहेब दातीर यांनी मानले.
कार्यक्रम यशस्वितेसाठी शोभा वरठि, स्वप्नील कदम, कैलास म्हस्के, सुनीता टेकवडे, हेमलता नवले, सीमा पाटील, मनीषा लाड, शीतल शितोळे, दीपाली झणझणे आदिंनी परिश्रम घेतले. 

Web Title: Need for right rites in changing times on our childrens says Uday Singh Patil

टॅग्स