अत्याचार थांबून दोषींना शिक्षा होण्यासाठी एकत्रित काम करण्याची गरज

Rape
Rape

पुणे - जात, लिंग, प्रदेश, भाषेमुळे कोणावरही अन्याय-अत्याचार होऊ नये म्हणून समाजातील चांगले बदल स्वीकारायला हवे. अत्याचाराच्या घटना थांबविण्यासाठी व दोषींना शिक्षा होण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज आहे, असे मत सामाजिक कार्यकर्त्या महिलांनी गुरुवारी व्यक्त केले.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

हाथरस बलात्कार पीडितेच्या मृत्यूला गुरुवारी (ता.29) एक महिना पूर्ण झाला आहे. या पार्श्‍वभूमीवर "आता उठाव केला नाही तर' मंचातर्फे महाराष्ट्र समितीने रोजच हाथरस अनुभवणा-या कार्यकर्त्यांना मनोगत व्यक्त करण्यासाठी वेबिनारचे आयोजन केले होते.

ट्रान्सजेंडर कार्यकर्त्या शमिभा पाटील, नॅशनल नेटवर्क ऑफ सेक्‍स वर्करच्या अध्यक्षा किरण देशमुख, आम्ही आरोग्यासाठी उपक्रमाच्या अध्यक्षा कुमारीबाई जामकतन, पारधी, भिल्ल समाजाच्या उन्नतीसाठी काम करणा-या सुनीता भोसले, जात पंचायत मोडून काढणारी कार्यकर्ती दुर्गा गुडीलू, जन आंदोलनाच्या राष्ट्रीय समन्वय अनिता पगारे आदींनी त्यात आपले अनुभव मांडले.

पगारे म्हणाल्या, हाथरस घटनेतील वैद्यकीय पुरावे नष्ट केले जाऊ नये, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. अशा घटनांबाबत आपण किती जागरूक आहोत हे आपल्या एकत्र येण्यावरून समजते. या गुन्ह्याच्या निकाल लागत नाही तोपर्यंत आम्ही तिच्या पाठीशी आहोत. कोणीही लिंग, भाषा, प्रदेश, जातीमुळे भरडला जाऊ नये.

पाटील म्हणाल्या, माझ्या समूहाला त्रासदायक ठरणा-या गोष्टींना कुठेतरी आळा बसला पाहिजे. त्यासाठी संवेदना व्यापक पद्धतीने समजून घेत त्यांची मांडणी व्हावी. त्यातील भावनांना आपण पुढे घेऊन जाणे गरजेचे आहे. देशमुख म्हणाल्या, आपण एकत्र येऊन लढा दिला तरच हाथरसमधील पीडितेला न्याय मिळेल. आपण जोपर्यंत जमत नाही तोपर्यंत अन्याय दूर होणार नाही. तर आपल्याला कोणीतरी येऊन वाचवेल हा विचार आता बदलला पाहिजे. महिलांनी स्वतः स्वतःची सुरक्षा केली पाहिजे, असे दुर्गा म्हणाल्या.

तपासात कसूर नको -
सामाजिक संघटनेत काम करताना पुरुषांनाही त्यात सहभागी केले पाहिजे. या गुन्ह्याच्या तपासात कोणताच कसूर राहता कामा नये. तरच पीडितेला न्याय मिळेल, असा विश्‍वास भोसले यांनी व्यक्त केला. तर कोणत्याही गोष्टीकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलायला हवा. आपण मानसिकता बदलली नाही तर अत्याचाराचा पूर्ण क्षमतेने सामना करू शकणार नाही, असे जामकतन म्हणाल्या.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com