इंदापूर तालुक्यातून नीरा नदी दुथडी भरुन वाहू लागली...

राजकुमार थोरात
शुक्रवार, 17 ऑगस्ट 2018

चालू वर्षी इंदापूर तालुक्यामध्ये पावसाने ओढ दिल्यामुळे शेतकरी चितांग्रस्त झाला होता. गेल्या काही दिवसापासून नीरा खोऱ्यातील धरण क्षेत्रामध्ये चांगला पाउस झाल्याने भाटघर, वीर, नीरा देवधर व गुंजवणीचे धरणे ओव्हरफुल होवू लागल्याने नीरा नदीमध्ये धरणातून पाणी सोडण्यास सुरवात करण्यात आली आहे.

वालचंदनगर - नीरा खोऱ्यातील धरणे भरल्याने नीरा नदीमध्ये पाणी सोडण्यास सुरवात करण्यात आल्याने इंदापूर तालुक्यातुन नीरा नदी दुथडी भरुन वाहू लागली असल्याने नदीकाठच्या गावातील शेतकरी वर्ग आनंदी झाला आहे.

चालू वर्षी इंदापूर तालुक्यामध्ये पावसाने ओढ दिल्यामुळे शेतकरी चितांग्रस्त झाला होता. गेल्या काही दिवसापासून नीरा खोऱ्यातील धरण क्षेत्रामध्ये चांगला पाउस झाल्याने भाटघर, वीर, नीरा देवधर व गुंजवणीचे धरणे ओव्हरफुल होवू लागल्याने नीरा नदीमध्ये धरणातून पाणी सोडण्यास सुरवात करण्यात आली आहे. सध्या नीरा नदी दुथडी भरुन वाहत असुन नदीकाठचे शेतकरी आनंदी झाले आहेत. नीरा नदीमध्ये जास्त पाणी आल्याने तालुक्यातील नदीकाठच्या गावातील शेतकऱ्यांचा फायदा होणार असुन पिण्याच्या पाण्याच्या योजना, शेतीच्या पाण्याचा प्रश्‍न, जनावरांच्या पाण्याचा प्रश्‍न जानेवारीपर्यंत मिटणार आहे. तसेच नीरा डाव्या कालव्याला ही पूर्ण क्षमतेने पाणी सोडण्यात येणार अाले असुन कालव्याच्या माध्यमातुन इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना पाणी मिळणार असल्याने तालुक्यामध्ये कमी प्रमाणात पाऊस असून पाणीच पाणी होणार आहे.
 

Web Title: Neera river is full of water in Indapur taluka