esakal | दत्तकला शिक्षण संस्थेत ६१९ विदयार्थ्यांनी दिली नीटची परिक्षा
sakal

बोलून बातमी शोधा

exam

दत्तकला शिक्षण संस्थेत ६१९ विदयार्थ्यांनी दिली नीटची परिक्षा

sakal_logo
By
डॉ. प्रशांत चवरे

भिगवण : वैदयकिय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी आवश्यक नीट परिक्षा स्वामी चिंचोली(ता.दौंड) येथील दत्तकला शिक्षण संस्थेच्या दत्तकला इंटरनॅशनल स्कुल(सी.बी.एस.ई) येथील परिक्षा केंद्रावर सुरुळीत पार पडली. ग्रामीण भागातील सर्वाधिक ६६० विदयार्थ्यांसाठी हे केंद्र देण्यात आले होते. त्यापैकी ६१९ विदयार्थ्यांनी येथे परिक्षा दिली तर ४१ विदयार्थी परिक्षेस अनुपस्थित राहिले. गतवर्षीच्या तुलनेत अनुपस्थित विदयार्थ्यांचे प्रमाण नगण्य होते.

ग्रामीण भागातील विदयार्थ्यांची सोय व्हावी यासाठी स्वामी चिंचोली(ता.दौंड) येथील दत्तकला शिक्षण संस्थेच्या दत्तकला इंटरनॅशनल स्कुल(सी.बी.एस.ई)मध्ये नीट परिक्षेचे केंद्र देण्यात आले होते. या केंद्रामध्ये परिक्षेसाठी जिल्हामधील सर्वाधिक ६६० विदयार्थी मंजुर करण्यात आले होते.

हेही वाचा: पर्यावरण व आरोग्यासाठी शिक्षकांनी सायकलचा वापर करणे गरजेचे

बहुतेक विदयार्थी हे बाहेर गावचे असल्यामुळे परिक्षार्थींबरोबर पालकही परिक्षा केंद्राच्या ठिकाणी उपस्थित होते.संस्थेच्या वतीने पालक, विदयार्थी व वाहनांसाठी स्वतंत्र व्यवस्था केली होती. परिक्षा केंद्रावर नॅशनल टेस्टींग एजन्सीने सुचित केल्याप्रमाणे विदयार्थ्यांचे शरिराचे तापमान घेण्याची सुविधा, बाकाची सॅनीटायझरच्या माध्यमातून स्वच्छता, दारांचे हॅंडल, जिना आदींचे निर्जंतुकीकरण करण्यात आले होते. विदयार्थ्यांना एन. ९५ चे मास्क देण्यात आले होते.

विदयार्थी परिक्षेच्या ठिकाणी जाण्यापुर्वी थर्मल स्कॅनिंगच्या माध्यमातून तापमान तपासण्यात आले. वर्गामध्येही सॅनीटायझरची व्यवस्था करण्यात आली होती. दुपारी दोन वाजता परिक्षा सुरु झाली. ६६० पैकी ६१९ विदयार्थ्यांनी परिक्षा दिली तर ४१ विदयार्थी अनुपस्थित राहिले.

हेही वाचा: प्रथमच मिळालेल्या स्पोर्ट गणवेशाने हरखुन गेली आदिवासी बालके

परिक्षा सुरुळित पार पाडण्यासाठी दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. रामदास झोळ, सचिव प्रा. माया झोळ, केंद्र संचालक म्हणुन दत्तकला इंटरनॅशनल स्कुलच्या प्राचार्या नंदा ताटे यांनी विशेष परिश्रण घेतले. याबाबत दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. रामदास झोळ म्हणाले, दत्तकला शिक्षण संस्थेस ग्रामीण भागातील सर्वाधिक विदयार्थ्यांचे केंद्र देण्यात आले होते. नियमांनुसार सर्व प्रक्रिया पुर्ण करुन ही परिक्षा सुरुळीत पार पाडण्यात आली. ग्रामीण भागात तुलनेने कोरोनाचा धोका कमी असल्यामुळे पालक व विदयार्थी वर्गातुन येथे केंद्र उपलब्ध करुन दिल्याबद्दल समाधान व्यक्त केले.

loading image
go to top