

The protesters also expressed support for the ongoing Jantar Mantar agitation and condemned the alleged police action against students in Delhi.
Sakal
शिरूर : केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी दिल्लीतील जंतर - मंतरवर चालू असलेल्या आंदोलनाला पाठिंब्यासाठी तसेच त्या आंदोलनादरम्यान, पोलिसांकडून विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीमाराचा निषेध करण्यासाठी शिरूरकर नागरीकांनी आज बंद पाळून तहसिलदार कार्यालयावर मोर्चा काढला. विविध संस्था - संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसह तरूण आणि महाविद्यालयीन विद्यार्थी - विद्यार्थीनी या मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.