

Police detained several protesters after they attempted to enter the office, causing brief traffic disruption on Jungli Maharaj Road.
Sakal
पुणे : दिल्लीमध्ये नीट पेपरफुटीविरोधी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी पुण्यात युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आज (ता. २१) केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या जनसंपर्क कार्यालयावर अचानक मोर्चा काढला. भर पावसात मोठ्या संख्येने कार्यकर्ते कार्यालयाबाहेर धडकल्याने पोलिसांची एकच धावपळ उडाली. कार्यकर्ते कार्यालयात घुसण्याचा प्रयत्न करताच पोलिसांनी मुख्य गेट बंद करून कार्यकर्त्यांना फरपटत बाजूला आणले.