Nagar Road BRT : बीआरटी तोडताना निष्काळजीपणा; अपघातामध्ये दोन युवक गंभीर जखमी

नगर रस्त्यावरील बीआरटी मार्ग तोडताना निष्काळजीपणा झाल्यामुळे अपघात होऊन दोन युवक गंभीर जखमी झाले आहेत.
Negligence in breaking BRT
Negligence in breaking BRTsakal

वडगाव शेरी - नगर रस्त्यावरील बीआरटी मार्ग तोडताना निष्काळजीपणा झाल्यामुळे अपघात होऊन दोन युवक गंभीर जखमी झाले आहेत. सुरक्षेचे उपाय न करता घाई गडबडीत बीआरटी मार्ग काढण्याच्या हट्टा पायी दोन कुटुंबावर मात्र संकट कोसळले आहे.

नगर रस्त्यावरील शास्त्रीनगर चौकात झालेल्या अपघातात गंभीर जखमी झालेल्या तरुणांचे नाव सुलेमान अकबर मगरे आणि अबरार समद सय्यद असे आहे. त्यांच्यावर शास्त्रीनगर येथील आणि येरवड्यातील खाजगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. दोघेही साईनगरी, वडगाव शेरी येथील राहणारे आहेत. अपघात गुरुवारी(ता ७) रात्री झाला.

जखमी तरुणांच्या पालकांनी आणि काँग्रेसचे पदाधिकारी करीम शेख यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे महानगरपालिकेने बीआरटी मार्ग काढण्याचा निर्णय घेतल्यानंतर रात्रीच तातडीने जेसीबी लावून बीआरटी मार्ग तोडायला सुरुवात झाली. नगर रस्त्यावरील सुरू असलेल्या वाहतुकीचा विचार न करता, तेथे सुरक्षेचे उपाय न करता, धोक्याच्या सूचना न लावता काम सुरू झाले होते. काही लोकांनी याचा फायदा घेत बीआरटीचे भंगार चोरून न्यायला सुरुवात केली.

बीआरटीचे भंगार डोक्यावर घेऊन धावत चाललेली एक महिला दुचाकीवरील तरुणांना धडकून अपघात झाला. त्यात हे दोन्ही तरुण गंभीर जखमी झाले. यातील सुलेमान हा तरुण उच्च महाविद्यालयीन शिक्षण घेत आहे. तर दुसरा तरुण कंपनीत कामाला आहे.

काँग्रेस पदाधिकारी करीम शेख म्हणाले, महापालिका अधिकाऱ्यांसमोर भंगार चोरीचा हा प्रकार सुरू असताना त्यांनी लोकांना मज्जाव केला नाही म्हणजे या प्रकाराला त्यांची मूकसंमती आहे. तसेच कोणतेही सुरक्षेचे उपाय घटनास्थळी करण्यात आलेले नव्हते. अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळेच हा अपघात झाला आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी आम्ही पालिका आयुक्तांकडे केली आहे.

बीआरटीतील निघणारे लोखंडी भंगार परिसरातील लोक घेऊन जात आहेत हे खरे आहे. भंगार चोरी थांबवण्याकरता आम्ही अद्याप पोलिसांकडे तक्रार दिलेली नाही. बीआरटी तोडताना सुरक्षेसाठी बॅरिगेट्स लावलेले आहेत.

- उपेंद्र वैद्य (उप अभियंता, पथविभाग, पुणे महानगरपालिका)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com