नेहा घावटे यांना कृषी प्रक्रिया पुरस्कार

कृष्णकांत कोबल
बुधवार, 4 जुलै 2018

मांजरी (पुणे) : वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त वसंतराव नाईक कृषी संशोधन व ग्रामीण विकास प्रतिष्ठानच्या वतीने दिला जाणारा कृषी प्रक्रिया पुरस्कार मांजरी बुद्रुक येथील कु. नेहा दत्तात्रय घावटे यांना मिळाला आहे. माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या हस्ते तो देण्यात आला. 21 हजार रुपये रोख, स्मृतीचिन्ह व शाल असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

नेहा गेली तीन वर्षांपासून "नँचरल अँग्रो'' नावाने कृषी प्रक्रिया उद्योग चालवत आहेत. विविध प्रकारचा शेतमाल व फळांचे निर्जलीकरण करुन त्याची पावडर बनविण्याचा उद्योग त्या करीत आहेत. वडिलांच्या अडीच एकर क्षेत्रात त्यांनी शेतमाल उत्पादनाबरोबरच निर्जलीकरण प्रक्रिया उद्योग उभारला आहे. त्यांच्या या कामाची दखल घेऊन संस्थेने त्यांना हा पुरस्कार दिला आहे. 

नेहा म्हणाल्या, "बाजार भावातील चढ उतार व वाया जाणारे उत्पादन यामुळे शेतकऱ्यांना अनेक वेळा नुकसाण सोसावे लागते. निर्जलीकरणामुळे मालाची टिकवण क्षमता वाढत असल्याने त्यामध्ये मला संधी दिसली. वडील दत्तात्रेय घावटे यांनी प्रोत्साहन दिल्याने मी  "नॅचरल अॅग्रो'' ची स्थापना केली. पालेभाज्यांबरोबरच विविध फळांचेही निर्जलीकरण माझ्या कंपनीत केले जात आहे. या पुरस्काराने माझा मार्ग योग्य असल्याचे सिध्द होत आहे.'

Web Title: neha ghavate got krishi prakriya award