Pune Crime : आईच्या शस्त्रक्रियेसाठी शेजाऱ्याच्या घरात चोरी; सात लाखांचे दागिने जप्त, एकास अटक

आईच्या शस्त्रक्रियेला लागणाऱ्या पैशांसाठी एकाने शेजाऱ्यांचे बंद घर फोडून दागिने आणि रोकड चोरल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
neighbors house broken for mother surgery jewelery worth around seven lakhs seized police action pune
neighbors house broken for mother surgery jewelery worth around seven lakhs seized police action pune Sakal

Pune News : आईच्या शस्त्रक्रियेला लागणाऱ्या पैशांसाठी एकाने शेजाऱ्यांचे बंद घर फोडून दागिने आणि रोकड चोरल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. चोरी करणाऱ्यांकडून पोलिसांनी सव्वा सात लाखांचे दागिने जप्त केले आहे. गुन्हा घडल्यानंतर आठ महिन्यांनी चोरीचा छडा लागला आहे.

या प्रकरणी पोलिसांनी दीपक नामदेव पाटोळे (वय ४१) याला अटक केली आहे. चोरी झाल्यानंतर बिबवेवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा करण्यात आला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दीपक बेरोजगार आहे.

तो आणि त्याची वृद्ध आई बिबवेवाडीतील एका सोसायटीत राहायला आहेत. गेल्या काही महिन्यांपासून त्याची आर्थिक चणचण सुरू होती. तर आई आजारी असल्याने त्यांची शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला होता.

आर्थिक चणचण दूर करीत आर्इच्या उपचारांसाठी त्याने गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात शेजाऱ्यांच्या बंद सदनिकेचे कुलूप तोडले व तेथून दागिने आणि रोकड चोरली होती. शेजारी मूळगावी सोलापूरला गेले असल्याचा फायदा घेत त्याने चोरी केली होती. शेजारी गावाहून परत आल्यानंतर घरफोडीचा प्रकार उघडकीस आला होता.

चोराचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी केलेले चित्रीकरण तपासासाठी ताब्यात घेतले होते. गेले सहा महिने गुन्ह्याचा छडा लागला नव्हता. मात्र पोलिस तपासात मिळालेल्या माहितीनुसार, पाटोळेने शेजाऱ्यांच्या घरात चोरी केल्याचे उघडकीस आले.

बिबवेवाडी पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक प्रवीण काळुखे, संतोष जाधव, विशाल जाधव, आशिष गायकवाड, शिवाजी येवले, प्रणय पाटील, ज्योतिष काळे आणि अभिषेक धुमाळ यांनी ही कामगिरी केली.

चोरीच्या पैशातून मोबार्इल टीव्हीची खरेदी

पाटोळेने शेजाऱ्यांच्या घरातून एकूण सव्वा सात लाख रुपयांचा ऐवज चोरला. त्या पैशांमधून त्याने आर्इवर उपचार करत स्वत:साठी नवीन मोबाईल घेतला. तसेच घरात नवीन टिव्ही देखील खरेदी केला होता. त्या राहणीमानात अचानक मोठा बदल झाला होता. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांचा त्याच्यावरचा संशय बळावला. चौकशीसाठी ताब्यात घेतले असता त्याने घरफोडीची कबुली दिली.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com