

Nepal Flood Latest News
esakal
Nepal Flood News: नेपाळमध्ये आलेल्या भीषण महापुरामुळे सर्वत्र हाहाकार माजला असून, या नैसर्गिक संकटात शेकडो भारतीय नागरिक अडकल्याची माहिती समोर आली आहे. नेपाळमधील पुरामध्ये तब्बल २८८ भारतीय नागरिक बेपत्ता असल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाकडून देण्यात आली आहे. बेपत्ता नागरिकांचा शोध घेण्यासाठी नेपाळमधील बचाव पथकांकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान, पुण्यातील चार पर्यटकही या पुरात अडकल्याची माहिती समोर आली असून, त्यापैकी एका तरुणीने नेपाळमधील विदारक परिस्थितीचा अनुभव सांगितला आहे.