नेपाळमध्ये पुन्हा महाप्रलयाचे संकट

नेपाळमध्ये पुन्हा महाप्रलयाचे संकट
Published on

नेपाळमध्ये पुन्हा महाप्रलयाचे संकट

‘बॅरियर लेक’ फुटण्याचा धोका? मृतांचा आकडा ५४७ वर

काठमांडू ः नेपाळ आणि तिबेटच्या सीमा भागात आलेल्या विनाशकारी पुरामुळे मोठी जीवितहानी झाली. या आपत्तीतील मृतांचा आकडा ५४७ वर पोहोचला आहे. तर १४७३ लोक जखमी झाले असल्याची माहिती नेपाळ पोलिसांनी दिली. शेकडो लोक अजूनही बेपत्ता आहेत. तर अचानक आलेल्या या पुरामुळे नेपाळ- चीन सीमेजवळ तयार झालेले एक मोठे जलाशय (बॅरियर लेक) फुटण्याचा धोका निर्माण झाला आहे.
हे जलाशय तुडुंब भरून वाहू लागल्याने नेपाळ आणि चीन या दोन्ही देशांनी सतर्कतेचा इशारा दिला आहे. माती, दगडांचा ढिगारा साचून तयार झालेला हा जलाशय फुटण्याचा धोका निर्माण झाला आहे. यामुळे बचावकार्य थांबवण्यात आले होते. पण शुक्रवारी (ता.२८) दुपारपर्यंत परिस्थिती नियंत्रणात आल्याचे चीनच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. यामुळे बचावकार्ये पुन्हा सुरू करण्यात आले.
रसुवा ते चितवन दरम्यानच्या नदीकाठी आणि बाधित भागांत शोधकार्यासाठी १२०० जणांचे एक पथक तैनात करण्यात आले आहे. येथील पूरपरिस्थितीची अधिकाऱ्यांनी गंभीर दखल घेत देखरेख वाढवली आहे. जलाशयातील पाण्याचा प्रवाह वेगाने वाढल्याने सखल भागांमध्ये अचानक पूर येण्याची शक्यता आहे. पुराचा धोका लक्षात घेऊन सखल भागांतील नागरिक उंच ठिकाणी स्थलांतर करत आहेत.
अद्याप ९५० हून अधिक लोक बेपत्ता आहेत. यात ५०० हून अधिक परदेशी नागरिकांचा समावेश आहे. त्यांचा शोध घेतला जात आहे. या ठिकाणी बचावकार्य सुरू आहे.

नेपाळने बचावकार्यासाठी मदत नाकारली
दरम्यान, नेपाळमध्ये शोध आणि बचावकार्यासाठी पथके पाठवण्याची तयारी अनेक देशांनी दर्शवली होती. पण नेपाळने मदत नाकारली आहे. आमची सुरक्षा यंत्रणा ही बचावकार्य हाताळण्यास सक्षम असल्याचे नेपाळ सरकारने म्हटले आहे. नेपाळ-चीन सीमेजवळ भोटेकोशी आणि त्रिशुली नदीच्या खोऱ्यांत बुधवारी अचानक भयंकर महाप्रलय आला. या महापुरामुळे सगळीकडे चिखल पसरला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com