esakal | अमोल काकांनी करुन दिला शिवरायांच्या जीवन चरित्राचा परिचय

बोलून बातमी शोधा

Netherlands Marathi Mandal Maharashtra Day childrens Chat Dr Amol Kolhe Facebook Live
अमोल काकांनी करुन दिला शिवरायांच्या जीवन चरित्राचा परिचय
sakal_logo
By
अक्षता पवार

पुणे : महाराष्ट्र दिनाचे (Maharashtra Day) औचित्य साधून नेदरलॅंडस् मराठी मंडळातर्फे(Netherlands Marathi Mandal) आयोजित ‘कवडसे भाग ३- गप्पा डॉ. अमोल कोल्हेंशी’ (Dr. Amol Kolhe) हा कार्यक्रम फेसबुक लाईव्हद्वारे संपन्न झाला. कोरोनाच्या (Corona)वातावरणात अॅमस्टरडॅम (Amsterdam) येथील मराठी मुलांनी उत्साहात या कार्यक्रमात सहभाग नोंदवला. तसेच छत्रपती शिवाजी महाराज(Chhatrapati Shivaji Maharaj) आणि छत्रपती संभाजी महाराज(Chhatrapati Sambhaji Maharaj) यांची भूमिका साकारणाऱ्या खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्याकडून शिवरायांच्या जीवना विषयी माहिती जाणून घेतली.

शिवरायांच्या विषयी बाल, युवा, प्रौढ या सर्वांना आपुलकी व प्रेम तर आहेच पण, ही जाणीव बालवयात रुजली तरच ते भविष्यातही कायम राहील. हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता. छत्रपती शिवरायांचे जीवन चरित्र (Biography of Chhatrapati Shivaji) जाणून घेण्यासाठी अमोलकाकांना प्रत्यक्ष भेटणे शक्य नसले तरी, ऑनलाइन वार्तालाप(Online Chat) करून या चिमुकल्यांना आनंद मिळाला. कोरोना काळात घरी बसून कंटाळलेल्या मुलांच्या मनावर त्यांनी अभिमानाची व उत्साहाची फुंकर मारली. हा कार्यक्रम बच्चे कंपनीला भविष्यात देखील प्रेरणादायी ठरणार आहे. (Netherlands Marathi Mandal Maharashtra Day childrens Chat Dr Amol Kolhe Facebook Live)

हेही वाचा: 'आमचे दोन्ही देव चोरीला गेले हो...' दोन्ही मुले गमावलेल्या ज्येष्ठ मातापित्यांचा टाहो

img

Netherlands Marathi Mandal Maharashtra Day childrens Chat Dr Amol Kolhe Facebook Live

हेही वाचा: 20 दिवसानंतर पुण्यात पेट्रोल-डिझेल महागलं; पाहा आजचे दर

या कार्यक्रमात मुलांच्या प्रत्येक प्रश्नावर त्यांच्या लाडक्या अमोल काकांनी समर्पक, योग्य व माहितीपूर्ण अशी उत्तरे देवून मुलांच्या उत्साहाचा परामर्श घेतला. तसेच डॉ. कोल्हे यांनी शिवाजी महाराजांबाबत अनेक माहीत असणाऱ्या गोष्टींमधील सत्यता सांगत अगदी समर्पक, तार्किक आणि दिलखुलास उत्तरे दिली. तर त्यांच्या जीवनात आईचे स्थान काय होते या प्रश्‍नाचे उत्तर देताना आई कधीच मुलाला चुकीचे किंवा अहिताचे सांगत नाही, म्हणून आईचे ऐकलेच पाहिजे हा संदेश मुलांना दिला.

या कार्यक्रमात श्रीअंश कुलकर्णी, सोहम दिक्षित, यथार्थ महाजन, मंजिरी राठोड, तन्मय खानोलकर, रुद्र हुंडारे, परिधी बंड, वेदांत सहस्रबुद्धे, नेत्रा चिंचोळकर, स्वरा चोपडे, आदी मुलांनी भाग घेतला होता. या कार्यक्रमाची प्रस्तावना आरती पटवर्धन आणि वरुण पालकर यांनी केली. तर दीप्ती निमकर कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले.

हेही वाचा: पुण्यात रेमेडिसिव्हिरविना ९१ वर्षीय आजोबांची कोरोनावर मात

महाराष्ट्रात आल्यास गड किल्ल्यांना भेट द्या...

शिवरायांचे गुण अंगी बाणवण्यासाठी मुलगा-मुलगी असा भेद न करता ते सर्वांनीच अंगी बाणवावेत. तसेच एखादे मोठे कार्य हातून घडले तरी त्याचा गर्व न बाळगता ‘इदं न मम’ हे वचन अंगीकारावे. महाराष्ट्रात आल्यास शिवरायांच्या गड किल्ल्यांना आवर्जून भेटी द्या, त्यामुळे मुलांच्या ज्ञानात भर पडून त्यांना आपल्या महाराष्ट्राचा अभिमान अधिकच जागृत होऊन वृद्धिंगत होईल. असेही त्यांनी मुलांना व त्यांच्या पालकांना सांगितले.

पुण्याच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा